आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Smooth Work We Appoint Department Head In Solapur Corporation

कामात सुसूत्रता आणण्यासाठी विभाग प्रमुखांची समिती नियुक्त करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील प्रत्येक विभागाकडे सोपवलेल्या जबाबदारीचा आढावा घेणे विभागाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुखांची समिती नियुक्त केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आयुक्तांनी महापालिकेत समिती नेमण्याचा बुधवारी निर्णय घेतला आहे.शासनाकडून योजनानिहाय येणारा निधी, किती दिवसानंतर निधी लॅप्स होतो, आलेला निधी किती दिवसात खर्च करायचा, यावर बैठकीत चर्चा झाली. कोणत्या विभागामार्फत किती उत्पन्न मिळते, किती खर्च होतो, उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण होते का याचा नियमित मासिक आढावा घेण्याचे काम ही समिती करेल.
समोर आलेल्या अडचणींवर मार्ग काढून रिझल्ट ओरिएंटेड काम होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांत जबाबदारी निश्चित केली जाईल. आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी चार पानांचे सूचनापत्र (सर्क्युलर) दिले आहे. नियमांचे पालन करणारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
मनपा हित महत्त्वाचे

महापालिकेच्या इमारतीला हेरिटेज म्हणून जाहीर केल्यास शासनाकडून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईल. यासाठी हेरिटेज कमिटी नेमावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समोर आले. महापालिकेच्या हितासाठी जे सूचना करतील, त्यांंच्याकडे मी जाऊन बसेन. लहान-मोठा असा भेदभाव करणार नाही. महापालिका हित हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त महापालिका