आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका, जपान व इराकच्या फळांना सोलापुरी बाजारपेठेची ओढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजारपेठेची व्याप्ती वाढल्याने आणि मालास योग्य दर मिळत असल्यामुळे आता सोलापूरच्या बाजारपेठेत परराज्य तसेच परदेशातील फळे विक्रीस येत आहेत. गृहोपयोगी वस्तूंवर ‘मेड इन यूएसए’ किंवा ‘मेड इन चायना’ अशी लेबल आपणास पाहावयास मिळतात. परंतु सध्या बाजार समितीत अशी अमेरिका, इराक व जपानमधील फळे विक्रीस आली आहेत. पण आवक कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेवर तसा कोणताही परिणाम झाला नाही. या सफरचंदाची आवक 3 टन असून यातील निम्मी कर्नाटकच्या बाजारपेठेत विक्रीस जातात.

पंजाबची संत्री व चंद्रपूरची ढोबळी : नागपूरच्या संत्र्यांबरोबर यंदा पंजाबहून आलेली पिवळार्जद संत्री बाजारात विक्रीस आलेली आहेत. ते 60 ते 70 रुपये डझन असून, महाराष्ट्रातील संत्र्यापेक्षा थोडे आंबट आहे. फोडी चघळल्यानंतर तोंडात चोथा जास्त रहात नाही. यंदा चंद्रपूरची ढोबळी मिरची येथे आली आहे. दर प्रति किलो लिलावानुसार निघत असून, सध्या किमान 40 रुपये किलोपासून आहेत.

दरही जेमतेमच
सफरचंद 20 किलोच्या पेटीत असून प्रति पेटी 1900 ते 2500 रुपये आहे. तर देशी सफरचंद 1200 ते 1400 रुपये प्रती पेटी आहे. इतर फळांवर आवकवर परिणाम झालेला नाही.

तिघांत एक पेटी
भारतात या फळांचा बहर जून ते सप्टेंबर या दरम्यान असतो. परंतु ही फळे तिकडील मोसमातील असतात. थोडी महाग आहेत, पण दोन-तीन जणात एक पेटी घेऊन चव चाखता येते.’’
-दत्तराज देढे, ग्राहक

मोठी बाजारपेठ
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस परराज्यांतील कृषी मालाची आवक होत आहे. त्यास योग्य दर मिळत असल्याचा हा परिणाम आहे.’’ - -धनराज कमलापुरे, सचिव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती