आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका छताखाली परदेश पर्यटनाची माहिती; कर्जाची सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- देश-विदेशांतील सहलींची सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ इस्टतर्फे शनिवारी (ता. 16) आणि रविवारी (ता. 17) प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सोलापुरात प्रथमच होत असलेल्या या प्रदशर्नात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचा स्टॉल विशेष आकर्षण ठरणार आहे.
हॉटेल त्रिपुरसुंदरी येथे सकाळी 10 ते रात्नी 9 या वेळेत भरणार्‍या या प्रदशर्नात एकूण 20 स्टॉल असतील. त्यात केसरी, एसओटी, क्लब महिंद्रा, सोलापूर पर्यटन आदी कंपन्यांचा सहभाग असेल. या सर्व सहलीसांसाठी येणार्‍या आर्थिक खर्चाची तरतूद सोलापूर जनता सहकारी बँकेच्या कर्जाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेचाही स्टॉल या ठिकाणी असेल. परदेशात वापरण्यात येणारे क्रेडिट, डेबीट कार्ड व इतर परकीय चलनाबाबतची सोय अँक्सिस बँकेमार्फत या ठिकाणी करून देण्यात येणार आहे. या सर्वांचीही माहितीही या बँका देणार आहेत. परदेशात जाणार्‍या पर्यटकांना विमा उतरविण्यासाठीची माहिती आणि सोय इन्शुरन्स कंपनीकडून होणार आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस चालणार्‍या दिवसभराच्या या प्रदशर्नात एका दिवसात पाच ते सहा हजार जणांनी भेट द्यावी असे नियोजन करण्यात आले आहे. प्रदशर्नाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता एमटीडीसीच्या विभागीय व्यवस्थापिका नयना बोंदार्डे यांच्या हस्ते होणार आहे. रोटरीचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झुबिन अमारिया यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रदशर्नासाठी रोटरीचे संजीव मेंते, राकेश उदगिरी, ललित म्हेत्नस, संतोष बुरबुरे, सुमित तंबाके आदी पर्शिम घेत आहेत.

माहिती देण्याचा प्रयत्न
सोलापुरात असे प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. नामवंत कंपन्यांबरोबरच स्थानिक पर्यटन क्षेत्रातील संस्था, कंपन्यांचाही सहभाग राहणार आहे. सर्व माहिती मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परदेशात पर्यटनास जाण्यासाठी ठिकाणे, मार्ग आदींची माहिती परिपूर्ण मिळत नाही. त्यामुळे अनेकांची अडचण होते. पर्यटन पूर्ण किंवा समाधानकारक होत नाही. याची संपूर्ण माहिती येथील प्रदर्शनात देण्यात येणार आहे. त्याला सोलापूरकरांनी प्रतिसाद द्यावा.’’
-संजीव मेंते, रोटेरियन

परदेश सहलीची इत्यंभूत माहिती मिळणार
विदेशातील सहली, सहलींसाठीची तयारी, त्यासाठी येणारा खर्च, विदेशातील पर्यटन स्थळे याची सविस्तर माहिती या कंपन्यांकडून सोलापूरकरांना मिळणार आहे. राज्य पर्यटन महामंडळाचा या प्रदशर्नात विशेष सहभाग राहणार असून, राज्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली जाणार आहे. माहिती संग्रहाचे ‘डीव्हीडी’ही उपलब्ध होणार आहे.