आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forest Department Giving Provosal For Carban Credit

वनविभागाकडून कार्बन क्रेडिटसाठी प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उपवनसंरक्षक व सामाजिक वनीकरणच्या शहरातील मुख्य कार्यालयांसह पाच तालुक्यांतील विभागीय कार्यालयांमध्ये पूर्णत: सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. कार्यालयातील संगणक, पंखे, बल्ब यांच्या वापरासाठीच नव्हे तर कूपनलिकांमधून पाणी उपसा करण्यासाठीही सौर ऊर्जा वापरली जातेय. कर्मचार्‍यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे कार्यालयांमध्ये विजेची मोठी बचत होत असल्याने कार्बन क्रेडिटसाठी वनविभाग प्रस्ताव सादर करणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे सौर ऊर्जा संच बसवण्यात आलेत. सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयातील दोन कूपनलिकांमधील पाणी उपसा करण्यासाठी एक किलो क्षमतेचे दोन सौरसंच बसवण्यात आलेत. त्याद्वारे गेल्या वर्षभरापासून पाण्याचा उपसा सुरू आहे. स्मृती उद्यानामध्ये बसवण्यात आलेल्या एक किलो क्षमतेच्या 15 सौर पथदिव्यांमध्ये उद्यान परिसर उजळला आहे. तसेच, कार्यालयातील संगणक, पंखे, बल्ब पूर्णत: सौर दिव्यांवर सुरू आहेत. वातानुकूलित यंत्रणेमुळे विजेचा जास्त वापर होत असून, कार्बन उस्तर्जन होत असल्याने कार्यालयातील वातानुकूलित यंत्र कर्मचारी व अधिकार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. स्मृती उद्यानात नव्याने उभारण्यात आलेल्या इको लायब्ररीमध्ये सौर ऊज्रेवरील कनेक्शन देण्यात आले. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने येणार्‍या विद्यार्थ्यांना येथील सौर दिव्यांचा प्रकल्प आवर्जुन दाखवण्यात येतो. सौर ऊर्जामुळे सामाजिक वनीकरण विभागातील वीज बिलांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त बचत झाली आहे. तर, उपवनसंरक्षक कार्यालयात वीज बिलात 30 ते 35 टक्के बचत झाली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयातील विद्युत दिवे व अधिकार्‍यांच्या निवासस्थानातील विद्युत उपरकरणेही सौर दिव्यांवर सुरू आहेत. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर वनविहार येथे चार वर्षांपूर्वीच सौर ऊज्रेवरील संच बसवण्यात आला आहे.