आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनौषधी उद्याने उभारले जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वनौषधी उद्यानांची निर्मिती करा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

सामाजिक वनीकरण, वृक्षमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने धनत्रयोदशीच्या निमित्ताने शुक्रवारी स्मृती उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड व त्याबाबतची कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक किशोर ठाकरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक अशोक पाटील, वनस्पतींचे अभ्यासक रामेश्वर फुगारे, बाबूराव पेठकर, प्रशांत बागेवाडीकर, विक्रम पंडीत, प्रा. राजा ढेपे, ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, आदित्य क्षीरसागर, अभिषेक देशपांडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मोहन धारिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडे लावण्यात आली.

शेत-शिवाराच्या परिसरात औषधी झाडे लावून त्याचे संरक्षण व संवर्धन करावे. वनविभागातर्फे त्यांच्या राखीव वनक्षेत्रात औषधी रोपांची लागवड करण्यात येत आहे,असे उपवनसंरक्षक ठाकरे यांनी सांगितले.

याप्रसंगी उपसंचालक अशोक पाटील, प्रशांत बागेवाडीकर, बाबूराव पेठकर, रामेश्वर फुगारे यांची भाषणे झाली. प्रारंभी लागवड अधिकारी एस. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले.