आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forests And Water Day, Latest News In Divya Marathi

चिमणी करते चिऊचिऊ, एक तरी झाड लावू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-‘चिमणी करते चिऊ चिऊ, एकतरी झाड लावू,’ अशी घोषणा देत विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृती रॅली काढली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या अभिनव रॅलीस गावकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागतिक चिमणी दिन, वनदिन व जलदिनानिमित्त दक्षिण सोलापूर तालुका संघ, रानवेध निसर्ग मंडळ व महात्मा फुले विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे वन्यजीव-पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून रॅलीचे उद्घाटन झाले. कलाशिक्षक भालचंद्र शिंदे यांनी घोषवाक्य फलक गावामध्ये लावले.
सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक अशोक पाटील म्हणाले, ‘‘एक घास चिऊचा.. चिमणे चिमणे दार उघड.. चिव-चिव चिमणे, या सारख्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो. बेसुमार वृक्षतोड, कोंदट झालेली फ्लॅट संस्कृती व जीवघणे प्रदूषण या चिमुकल्या पक्ष्यांसाठी घातक ठरत आहे. त्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. गॅलरीत किंवा खिडकीच्या एका कोपर्‍यातत एका वाटीत धान्य व पाणी ठेवावे.’’
याप्रसंगी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य विर्शांत गायकवाड, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विष्णू सरगर, दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोगसिद्ध मुंजे, सचिव आमसिद्ध व्हनकोरे, नंदकुमार वारे, रानवेध निसर्ग मंडळाच्या सचिवा नीलिमा कामतकर, वनमजूर संजय भोईटे, महात्मा फुले विद्यालयाचे हरित सेना प्रमुख मुकेश अडसूळ, कला शिक्षक भालचंद्र शिंदे, क्रीडा शिक्षक शिवकुमार केवटे, शिवशंकर राऊत आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.