आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Captain Mohammad Azharuddin Rally At Solapur Latest News In Divya Marathi

सोलापूरच्या राजकीय पीचवर नाबाद राहण्यासाठी प्रणिती शिंदेंना निवडून द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापुरातमी ३० वर्षांपूर्वी क्रिकेट खेळण्यासाठी आलो. तेव्हा मी दक्षिण विभागाकडून प्रतिनिधित्व करताना नाबाद 42 धावांची खेळी केली होती. त्याप्रमाणे प्रणिती शिंदे यांना नाबाद राहण्यासाठी तुम्ही निवडून द्या, असे आवाहन माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीन यांनी केले.
येथील हेरिटेज हॉलमध्ये वकील खेळाडूंचा मेळावा घेण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. १९८४ मध्ये मी देवधर करंडक खेळण्यासाठी सोलापुरात आलो होतो. मैदानाचे नाव मला आठवत नाही, असे त्यांनी म्हटल्यावर खेळाडूतून पार्क असे सांगण्यात आले. ते चांगल्या स्थितीत आहे का? असे म्हटल्यावर परत खेळाडूतून होकार आला. त्यानंतर ते म्हणाले, छोट्या गावातील खेळाडूंत टॅलेंट आहे. त्यासाठी गावात खेळांच्या सोयीसुविधा वाढण्यासाठी तरुण उमेदवारांना मत द्या. माझ्या खेळीला प्रोत्साहन दिले. त्याबद्दल मी भारतीय जनतेचा आभारी आहे. खेळानंतर मी राजकारणातून खेळांचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. यू. एन. बेरिया यांनी प्रास्ताविक केले. या वेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. टी. शिंदे, मिलिंद थोबडे, नितीन हबीब, शर्मिला देशमुख, गंगाधर रामपुरे खेळाडूंच्या वतीने ए. डी. चिनीवार यांनी अापले मनोगत व्यक्त केले. या वेळी काँँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, बारचे माजी अध्यक्ष शिवशंकर घोडके, रणजीपटू नितीन देशमुख, राजन कामत आदी उपस्थित होते.

"व्यासपीठावर जर अकरा लोक असते तर मी सर्वांची नावे घेतले असती. मात्र येथे तीन टीमचे लोक आहेत, अशा शब्दांत माजी खासदार मोहंमद अझरुद्दीन यांनी व्यासपीठावरील भाऊगर्दीला टोला दिला. युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष मुजाहीद बागवान यांनी रविवारी रात्री विजापूर वेस येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. तसेच त्यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडून प्रणिती शिंदेंचे प्रतिस्पर्धी बनले आहेत त्यांनाही टोलेबाजी केली. काँग्रेसच्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. व्यासपीठावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, विजापूरचे महापौर सज्जादेपिरा मुश्रीम, आमदार मकबूल बागवान यांच्यासह ४० ते ५० लोक विराजमान होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी मै आपकी बहन हूँ, मुझे चुन के लाके फिरसे मौका दो, असे भावनिक आवाहन केले.