आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Chief Minister Mayawati Rally At Solapur,latest News In Divya Marathi

जो जमीन सरकारी, वो तुम्हारी- माजी मुख्यमंत्री मायावती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उत्तरप्रदेशातील बेरोजगार आणि भूमिहीनांचे प्रश्न सोडवताना ‘जो जमीन सरकारी वो तुम्हारी..’हा नारा दिला. त्याचा अंमल केला. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. हाच प्रयोग महाराष्ट्रात राबवू. त्यासाठी बहुजन समाज पक्षाची सत्ता आणा, असा नारा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी दिला. गुरुवारी दुपारी होम मैदानावर त्याची जाहीर सभा झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या,“स्वातंत्र्योत्तर काळात मागास जाती, दलित, धार्मिक अल्पसंख्याक यांची अपेक्षित प्रगती झाली नाही. केंद्रातील सरकारांनी चुकीची आर्थिक धोरणे राबवून महागाई वाढवून ठेवली. भांडवलदारांचे चोचले पुरवले. त्यात गरीब भरडले गेले. त्यामुळे गरीब अधिक गरीब तर श्रीमंतांची श्रीमंती वाढतच आहे. आरक्षणाच्या मुद्यावर मागासांना विकासाच्या प्रवाहात अाणण्याचे सोडून आरक्षण मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या राज्यात आरक्षण टिकवणे गरजेचे आहे.”
काँग्रेस-राष्ट्रवादीचराज्यातील समस्यांना जबाबदार
महाराष्ट्रातभ्रष्टाचार, घोटाळे वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस आणि भाजपकडे एकवटलेली सत्ता. दोन्ही पक्षांनी या राज्यांत अनेक समस्या िनर्माण करून ठेवल्या. भांडवलदारांच्या मदतीने सत्तेत येणे आणि गरिबहितविरोधी धोरणे राबवणे हाच त्यांचा कार्यक्रम राहिला. त्यामुळे पुन्हा त्यांच्या हाती सत्ता दिल्यास सामाजिक व्यवस्था बिघडून जाईल. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून ते सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांच्यापासून सावध राहा, असा इशाराही त्यांनी दिला.