आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former HomeMinister Sushil Kumar Shinde Birthday Special Story

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day Spl : हे आहेत भारताचे माजी गृहमंत्री, CID मध्ये होते उपनिरीक्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र पोलिसात हवालदार पदावरून कारकिर्द सुरू करून देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत मजल मारणा-या एका व्यक्तीमत्त्वाची ओळख या पॅकेजद्वारे करून देण्यात येत आहे. काळ बदलत गेला तसा त्यांचा राजकारणात रस वाढला व ते या वाटेवर मार्गस्थ झाले. हे आहेत भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे. आज शिंदे यांचा 73 वा वाढदिवस आहे.
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबर 1941 ला त्यांचा जन्म झाला होता. शिंदे यांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या सीआयडी विभागात उपनिरीक्षक पदही सांभाळले होते. तर पुढे संपूर्ण देशाची कायदेव्यवस्थाही त्यांनी सांभाळली होती.

शरद पवारांनी आणले राजकारणात
माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 1965 पर्यंत सोलापूरच्या न्यायालयात वकिलीही केली. त्यानंतर ते पोलिस सेवेत हवालदार म्हणून रुजू झाले. त्यानंतर काही दिवसांत त्यांना सीआयडी विभागात उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. 1971 मध्ये शरद पवार यांनी त्यांना पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा देण्यास सांगून राजकारणात आणले. तेव्हापासून त्यांनी राजकारणात भरारी घेतली.

गृहमंत्री, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री पदे सांभाळली
15 व्या लोकसभेच्या कार्यकाळात सुशील कुमार शिंदे यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. ते पाच वेळा महाराष्ट्रातून आमदारकीची निवडणूक जिंकले. या काळात त्यांनी राज्यमंत्री पदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक पदे सांभाळली. काही काळासाठी ते राज्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते.

2004 मध्ये बनले राज्यपाल
2004 मध्ये जेव्हा केंद्रात युपीएची सत्ता आली त्यावेळी सुशील कुमार शिंदे यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. पण वर्षभरात त्यांनी हे पद सोडले. त्यानंतर ते 2006 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांना केंद्रीय ऊर्जामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. 2009 मध्ये युपीएची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना ऊर्जामंत्री बनवण्यात आले. त्यानंतर 31 जुलै 2012 रोजी त्यांना गृहमंत्री बनवण्यात आले.

सोनियांचे नीटकवर्तीय
सुशील कुमार शिंदे हे सोनिया गांधींचे नीकटवर्तीय मानले जातात. 1999 मध्ये सोनिया गांधींनी त्यांना अमेठीच्या प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यानंतर 1999 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. सोनिया गांधींच्या निर्देशावरून त्यांनी 2002 मध्ये एनडीएचे उमेदवार भैरोसिंह शेखावत यांच्या विरोधात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढले पण त्यांचा पराभव झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा सुशील कुमार शिंदे यांचे फोटो...