आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former MLA Dhanaji Sathe Latest News In Divya Marathi

साठे पिता-पुत्र मनसे व्हाया भाजपमध्ये, माढ्यातून आता दादा साठे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि कै. विलासराव देशमुख यांचे समर्थक माजी आमदार धनाजी साठे आणि त्यांचे चिरंजीव गणपत (दादा) साठे यांनी गुरुवारी माजी खासदार सुभाष देशमुख जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माढ्यातील स्वािभमानी संघटनेचे संजय घाटणेकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अपक्ष असलेले दादा साठे यांना भाजपने पाठिंबर दिला आहे.
माढा मतदारसंघात मागील दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने दादा साठे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन िदवसांपूर्वी मनसे यांनी साठे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे साठे आता मनसेत जाणार अशी चर्चा रंगत असतानाच धनाजी साठे, दादा साठे, मंगल पाटील यांच्यासह सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपमध्ये आणण्यात राजकुमार पाटील यांनी प्रयत्न कामाला आले.