आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सुभाष देशमुखांचे प्रदेशाध्यक्षपदावर लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देवेंद्रफडणवीस मंत्रिमंडळात सोलापूरच्या देशमुखांचे काही चालणार नाही असे दिसताच आता दोन्ही आमदार देशमुखांनी अपपल्यापरीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार सुभाष देशमुख यांनी आता प्रदेशाध्यक्षपद पदरी पडावे यासाठी नितीन गडकरी यांच्यामार्फत फिल्डिंग लावली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मंत्रिपदासाठी मुंबईत ठिय्या मांडला आहे.
काही महिला पदाधिकारी त्यांच्या समर्थनार्थ मुंबईला रवाना झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले. ते कोल्हापूरचे असल्याने विभागाच्या तुलनेनुसार पश्चिम महाराष्ट्रात स्थान देण्यात आले. त्यामुळे विस्तारात सोलापूरचा समावेश असेल का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुभाष देशमुख हे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात स्थान असलेले एकमेव नेते आहेत. साखर कारखाने, दूध उत्पादन, बँक अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे काम आहे. त्यांनी स्वत:ची एक ताकद उभारली आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. तसेच लोकसभा, विधानपरिषद आणि आता विधानसभा अशा तीनही सभागृहांचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे सत्तापद मिळावे यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशमुख हे आशावादी असून, मंत्रिपदासह भाजप प्रदेशध्यक्ष पद मिळेल का यांची ते चाचपणी करत आहेत.