सोलापूर - शेगाव (ता. अक्कलकोट) येथील भीमाशंकर म्हेत्रे खून खटल्यात न्यायालयाने सोमवारी माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे, बाबूराव पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह 19 जणांची निर्दोष मुक्तता केली, तर मारहाणीच्या गुन्ह्यात नऊ जणांना तीन वर्षे, तर एकाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. 2009 मध्ये घडलेल्या या प्रकरणात सिद्धराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, बाबूराव पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत हत्तरकी, उस्मान महिबूब शेख, संगय्या स्वामी, रमेश पाटील, सतीश अरवत, आमसिद्ध पुजारी, सिद्धदप्पा पाटील, अमृतलिंग कोळी, महेश हत्तरकी, पंचप्पा बिराजदार, शरणप्पा बिराजदार, सिद्धप्पा बिराजदार, रविकांत यशवंत पाटील, शैलेश चौगुले, आनंदप्पा बिराजदार यांची निर्दोष मुक्तता झाली. मल्लिकार्जुन पाटील याला 4 वर्षे, तम्माराव पाटील, गुरुनाथ पाटील, हणमंत पाटील, अण्णाराव पाटील, मल्लय्या स्वामी, जगदेव पाटील, महादेव पाटील, श्रीशैल पाटील, अप्पाराव पाटील यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.