आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Union Minister Gulamanabi Azad Rally At Solapur

धर्माच्या नावावरून मुस्लिम समाजाची होतेय दिशाभूल- गुलामनबी आझाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहर काँग्रेस कमिटीतर्फे अॅचिव्हर्स सभागृहातील कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री आझाद बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते. या वेळी शहर उत्तरचे उमेदवार माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर मध्यच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी महापौर यू. एन. बेरिया, आरिफ शेख, रफिक हत्तुरे आदी उपस्थित होते.
श्री. आझाद म्हणाले, “हिंदू मुस्लिम समाजातील काही पक्ष धर्माचे नाव पुढे करीत एकमेकांच्या विरोधात भडकवत आहे. जाती-धर्माच्या नावाने सुरू असलेल्या राजकारणातून कुणाचेही भले होणार नाही. भाजप, शिवसेना एमआयएम हे पक्ष जात धर्माच्या नावाने राजकारण करीत आहेत. त्या पक्षांना थोपवण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही, कारण तो फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत आहे. पण, धर्मनिरपेक्षता हे काँग्रेसचे मुख्य सूत्र असून, राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे जाती-धर्माच्या नावाने राजकारणा करणाऱ्यांना थोपवण्याची शक्ती फक्त काँग्रेसमध्येच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रातील यूपीए सरकाराने मागील दहा वर्षांमध्ये लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. जगातील कोणत्याही देशामध्ये हज यात्रेसाठी विशेष सवलती नाहीत. पण, फक्त भारतामध्ये ती योजना काँग्रेसने लागू केली, हे वास्तव आहे. शहर मध्यमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद यांनी सभा घेतली. सभेत बोलण्यापूर्वी त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी अशी गुफ्तगू साधली. पहिल्या छायाचित्रात उपस्थित जनसमुदाय.
अशी वेळ दु:खद
माजीकेंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी चार वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला, विविध मंत्रिपदांसह मुख्यमंत्रिपद सांभाळले. केंद्रातील लोकसभेचे नेतेपद त्यांच्याकडे होते. अशा व्यक्तीच्या नावाच्या वलयामुळे त्यांच्या भागातील 80 टक्के कामे अपोआप होतात. पण, एवढ्या मोठ्या राजकीय व्यक्तीस त्यांच्याच सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतासाठी आवाहन करावे लागणे, हे फारच दु:खद आहे, असे मत आझादांनी व्यक्त केले.
पुढारी साधताहेत स्वार्थ
मुस्लिमफंडामेंटलद्वारे तरुणांची दिशाभूल करून त्यांना वाईट मार्गाला लावण्याचे कारस्थान सुरू आहे. धर्माच्या नावाखाली दिशाभूल करीत स्वत:चा स्वार्थ ते राजकीय पुढारी साधत आहेत. आरएसएस- भाजपही तेच करीत आहेत. देशातील धर्मनिरपेक्षता तोडण्याचा प्रकार त्या पक्षांकडून सुरू असून, त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन श्री. आझाद त्यांनी यानिमित्त बोलताना केले.
यूपीए सरकारने 10 वर्षांत सर्वाधिक कामे केली
गेल्या 65 वर्षांच्या तुलनेत यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये देशात सर्वाधिक कामे केलीत. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी हजारो कोटींची विशेष तरतूद केली. ग्रामीण भागांमध्ये चांगल्या दर्जाच्या शाळा, आरोग्य सुविधा रस्त्यांची कामे केली. कमवा-शिका ही योजना आम्हीच लागू केली, असे मत त्यांनी व्यक्त केले.