आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार नव्या शाळा सुरू होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यात चार नवीन प्राथमिक शाळा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच विषय तज्ज्ञ शिक्षकांची 66 पदे भरण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती सभापती शिवानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हातीद (ता. सांगोला) येथे बापू शिंदे वस्ती येथे नवीन शाळा सुरू करणे, केगाव (ता. उत्तर सोलापूर) मराठी शाळेत पाचवीचे वर्ग भरविण्यास मंजुरी, कुरुल (ता. मोहोळ) येथील दोन्ही जिल्हा परिषदेच्या शाळा एकत्रित भरवणे, नातेपुते ग्रामीण पालखीतळ येथे पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करणे, बीबी दारफळ येथे विद्यार्थी संख्या वाढल्याने नवीन शाळा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शाळांच्या परिसरातील सर्वच मोठय़ा रस्त्यांवर गतिरोधक उभारण्यात येतील. जिल्ह्यात 66 विषय तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. त्यामध्ये एक गट समन्वयक व पाच विषय तज्ज्ञांची निवड होईल. पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने विषय तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. तेथील 37 अतिरिक्त पदे जिल्ह्यात समाविष्ट करून घेण्यात येणार असून उर्वरित रिक्त पदे जिल्हा परिषद भरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. बैठकीला सदस्य ताई मिसाळ, कौशल्या माळी, मालती देवकर, राणी दिघे, झुंजार भांगे, विठ्ठल आवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.