आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळ, अकलूज अपघातात चार जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धनाजी भाळे, कृष्णा वडतिले )
मोहोळ- दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. मोहोळजवळ झालेल्या अपघातात दोघे तर अकलूजजवळ झालेल्या अपघात दोन जण ठार झाले.
मोहोळजवळ पहाटे अपघात : दुसऱ्याचीगाडी बंद पडली म्हणून मदतीसाठी थांबलेल्या दोन भावांना पाठीमागून कंटेनरची जोरदार धडक बसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. इतर चार जण जखमी झाल्याची घटना मोहोळ-टेंभुर्णी महामार्गवर मोहोळपासून तीन किलोमीटर एका धाब्यासमोर शनिवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडली.
या अपघातात चंद्रकांत बालाराम लंजीले (३२) त्यांचे भाऊ ित्रपाल बालाराम लंजीले (२५) यांचा मृत्यू झाला. पुण्याहून सोलापूरकडे वेगात िनघालेल्या कंटनरने (एपी २८ टीए ७४५१) लंजीले बंधू यांच्या झेन कारला (एमएच १२ केएन ००८) जोरदार धडक दिली.
टीपरने दोघांना चिरडले :
टीपरने (एमएच ४५ - ३३३४) दुचाकीवरच्या (एमएच ४५ एम ५३५१) दोघांना चिरडल्याने माळेवाडी (अकलूज) येथील दोघे जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी पिलीवहून निमगावकडे निघालेल्या टीपरने दुचाकीवर जाणाऱ्या धनाजी भोळे (२४) आणि कृष्णा बंडू वडतिले (२०) या दोघांना चिरडल्याने ते जागीच ठार झाले.