आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याला गंडा घालणारे चौघे पोलिस निलंबित; एकूण नऊ संशयितांपैकी सहाजणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दाम दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने एका तरुण शेतकऱ्याला सव्वालाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बनावट छाप्याचा बहाणा केल्याप्रकरणी चौघा पोलिसांसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात भारत पांडुरंग जाधव (वय ४७, रा. सुदीप कॉम्लेक्स, होटगी रोड) या मुख्य संशयिताचा समावेश आहे.

सोमवारी मध्यरात्री त्यांना अटक झाली. दुपारी हजर केले असता त्यांना न्यायाधीश सौ. पी. व्ही. हिंगणे २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी िदली. संदीप रमेश काळे (वय ३०), पोलिस नाईक सुरेंद्र दत्ता काळे (वय ३०), पोलिस नाईक महेबूब मुस्तफा शेख (वय ४०, रा. तिघे नेमणूक पोलिस मुख्यालय, शहर), सोमनाथ दत्ता काळे (वय २६, रा. नेमणूक सदर बझार पोलिस ठाणे), आनंद रामपाल वाल्मीकी (वय ४५, रा. न्यू महात्मा फुलेनगर, सिध्दार्थ चौक) अशी त्यांची नावे आहेत. राम ननवरे (रा. बीबीदारफळ) याच्यासह एक पोलिस आणखी एक गायब आहे.

मेहबूब रड्डे (रा. जोशी गल्ली, बाळे, मूळगाव आलूर, उमरगा) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. मागील एक वर्षापासून पैसे दामदुप्पट देतो, म्हणून जाधव हा पैसे उकळत होता. काल दुपारी पावणे दोनच्या सुमाराला शिवराज बारसमोर बाळे येथे बोलावले. नंतर ठिकठिकाणी बोलावून एकूण सव्वालाख रुपये घेतले. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरात रड्डे यांना बोलावून घेतले. त्याच्याकडून पैसे घेत असताना पोलिस छापा पडल्याचा बहाणा केला. त्यात चार पोलिस सामील होते. छापा बनावट असल्याचे समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली सरकारतर्फे राठोड, आरोपीतर्फे यू. डी. जहागीरदार, रियाज शेख, रजाक शेख, जे. डी. सुरवसे, सुरेश पाटील-कुरूलकर या वकिलांनी काम पाहिले. घटनेत एकूण नऊ संशयित असून तिघेजण अद्याप गायब आहेत. त्यापैकी दोघांची नावे निष्पन्न व्हायची आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याची मािहती साहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जी. कोळेकर यांनी दिली.

भारत जाधव, वाल्मीकी यांच्यावर यापूर्वीही गुन्हे
भारतजाधव हा फसवणूक करण्यात सराईत आहे. त्याच्यावर सदर बझार पोलिसात चार गुन्हे दाखल आहेत. वाल्मीकीवरही गुन्हे दाखल आहेत.

चौघे पोलिस निलंबित
संदीप काळे, सुरेंद्र काळे, महेबूब शेख, सोमनाथ काळे या चौघा पोलिसांना पोलिस उपायुक्त अश्विनी सानप यांनी निलंबित केले आहे.

नातेवाइकांचा गोंधळ
सहा संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अरेरावी करून हुज्जत घातली.