आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणिसंग्रहालयात चार बिबटे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लखनौ(उत्तर प्रदेश) येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील चार बिबटे शनिवारी सकाळी प्राणिसंग्रहालयात दाखल झाले. त्यांचे पिंजरे उतरवून घेण्यासाठी प्राणीरक्षक सरसावले. पण, नवीन ठिकाणी उतरण्यास तयार नसलेल्या बिबट्यांची धडपड सुरू झाली. प्राणिसंग्रहालयातील शंकर नावाचा सिंहाने ते पाहिले. नव्या पाहुण्यांचा वास आल्याने जणू त्यांच्या स्वागतासाठी जोरदार डरकाळी फोडली. पण, वनराजाचा आवाज ऐकताच पिंज-यात गुरगुरत कुणालीही जवळ फिरकूही देणारे पाहुणे बिबटे शांत झाले.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) यांच्याकडून नवीन प्राणी आणण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बिबटे आणण्यासाठी पुढाकार घेतला. लखनऊच्या राष्ट्रीय उद्यानातून चार बिबटे नेण्यास परवानी मिळाली. २४ जानेवारीला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रापतवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या १० जणांची टीम लखनऊला गेली. लखनौ उद्यानात असलेल्या चार बछड्यांपैकी जिम्मी नावाचा बिबटा तेथील मुख्यमंत्री अखिलेशकुमार यादव याच्या मुलांचा विशेष आवडता असल्याने तो देण्यास टाळटाळ व्हायची. पण, नंतर तो मिळाला.

२१ दिवसांनंतर खुले
लखनऊसारख्याथंडीच्या वातावरणात राहिलेल्या त्या बिबट्यांना सोलापुरातील उष्ण वातावरणाशी जमवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या छोट्या पिंज-यात ते बिबटे बंदिस्त आहेत. पूर्वीच्या सोनू नावाच्या बिबटा वाघाच्या पिंज-यात त्यांना सोडण्यात येणार आहे.

असे आहेत बछडे
दोननर दोन मादी असे चारही बिबट्यांचे बछडे फक्त दोन ते अडीच वर्षे वयाचे आहेत. जिम्मी, ईना, बलराम राघू अशी नाव आहेत. एका बिबट्याला रोज किमान पाच किलो चिकन, दोन किलो मटन लागते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रापतवार, प्राणीरक्षक भरत शिंदे, विनोद कांबळे हे बिबट्यांची विशेष काळजी घेत आहेत.