आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी योजनेसाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचा नवा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बनावटजाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे नव-नवे फंडे शोधले जात आहेत. महिला बालकल्याण योजनेसाठी नोकरीच्या संधीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शासकीय योजनांच्या नावे बनावट जाहिराती प्रकाशित करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला गळ टाकला जात आहे. सुकन्या बाल विकास योजना राबवण्यासाठी दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी, अशी जाहिरात प्रकाशित करुन तब्बल पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असले तरी याबाबत पोलिसात एकही गुन्हा नोंद झालेला नाही.

झेडपीमध्ये नोकरीचे अमिष दाखवून लाखोंची फसवणूक झाल्याची तक्रार केली जात असतानाच बालकल्याणचा फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे. सरकारी योजनेच्या नोकरीसाठी जाहिरात प्रसिध्दीस देण्यात आली होती. तसेच "डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. सरकारी नोकरी डॉट इन्फो' असे संकेतस्थळही देण्यात आले. याला प्रतिसाद म्हणून शहरातील अनेकांनी भ्रमणध्वनीवर (०७४१७६९३२५९) आपले नाव, वय, पत्ता, शैक्षणिक अर्हतेची माहिती दिली. त्यानंतर प्रक्रिया पार पडली. अर्जदारांना पाठवलेल्या नियुक्तीपत्रात महिना २४ हजार ७०० आणि २५ हजार ७०० रुपये पगार मिळेल असा उल्लेख होता.

अर्ज करणाऱ्यांना तुम्ही पात्र आहात, असे पत्र नवजात शिशु जन्म पंजीकरण केंद्र, पणजी येथून मिळाली. पत्रात होता उल्लेख सरकारी जाड पिवळसर कागदावर सिंहाची राजमुद्रा, लाल रंगाच्या शाईचा शिक्का तर एका पत्रावर अपर सचिव वसंतनाथ पाटील आणि दुसऱ्यावर डायरेक्टर राजेश देशमुख यांची स्वाक्षरी आहे. तसेच "अप्रुव्हड सर्टिफिकेट' असा विशेष शिक्का मारण्यात आला आहे. हे आहेत क्रमांक- या नियुक्ती पत्रावर ०८५२७०५५३५६ जाहिरातीमध्ये ०७४१७६९३२५९ असे भ्रमण तसेच दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत.

प्रस्तुत प्रतिनिधीने संबंधित क्रमांकावर फोन लावल्यानंतर रिंग वाजली, पण फोन उचलला नाही. अजूनही हे दोन्ही क्रमांक सुरू आहेत. तसेच पंढरी यांना भ्रमणध्वनीवर स्टेट बँक ऑफ इंिडयाच्या ३२२८२४३३८१९ या खात्यावर पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अर्जदारांनी खात्यावर १५ हजार ५०० रुपये भरलेले आहेत.
फसवणुकीच्या तक्रारी आहेत
*राज्यअथवा जिल्हा महिला बालविकास कार्यालयाने अशी जाहिरात दिलेली नाही. सुमारे १५ लोकांनी फसवणुकीची तोंडी तक्रार केली आहे. धर्मपालशाहू, जिल्हामहिला बालविकास अधिकारी
१५ हजारांची फसवणूक
*यासंदर्भातीलजाहिरात एका दैनिकात प्रकाशित झाली होती. त्यात दिलेल्या नंबरवर मी एसएमएस केला. चार दिवसांत घरी नियुक्तीपत्र आले. पत्रात सांगितल्यानुसार १५ हजार ५०० रुपये बँकेत जमा केले. सारिकाहरी पंढरी, विद्यार्थिनी
एकाच उमेदवारास दोन नियुक्तीपत्रे
पंढरीया एका विद्यार्थिनीस अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दोन नियुक्तीपत्रे आलेली आहेत. यातील पहिले पत्र २८ एप्रिल २०१४ ला हिंदी भाषेतून तर मे २०१४ रोजी लगेच मराठी भाषेतील पत्र आले आहे. दोन्ही पत्रांवर सही असणारे अधिकारी आणि पदे वेगवेगळी आहेत.