आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कोड मागून व्यापाऱ्याला गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘मी आपल्या बँकेतून बोलतोय. आपला एटीएम कोड नव्याने देणार आहोत, तुमचा कोड सांगा’ असे म्हणत ऑनलाइन शॉपिंग करून वीस हजारांचा गंडा एक़ा व्यापाऱ्याला घालण्यात आला आहे. प्रतीक अनिल गांधी (रा. पश्चिम मंगळवारपेठ, सोलापूर) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

प्रतीक कामानिमित्त पुण्यात असतात. त्यांचे वडील अनिल हे कापड व्यापारी असून ते सोलापुरात राहतात. शुक्रवारी वडिलांना त्यांच्या मोबाइलवर फोन आला. मी बँकेतून बोलतोय. आपले एटीएम कोड सांगा असे म्हणाल्यानंतर त्यांनी आपला कोड सांगितला. काही वेळातच पाच हजार रुपयांची ऑनलाइन खरेदी केल्याचा फलटण गल्लीतील बँक ऑफ महाराष्ट्रातून मोबाइलवर मेसेज आला. त्यानंतर काही वेळाने अकरा वेळा ऑनलाइन वीस हजार रुपयांची खरेदी केल्याचे उघडकीस आले. बँकेतून जाऊन चौकशी केल्यानंतर कुणीतरी फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

कोड मागत नाही
-कोणतीहीबँक ग्राहकांना एटीएम कोड मागत नाही. तसा फोन आल्यास सावध राहावे, अथवा पोलिसांना माहिती द्यावी. आपला कोड परिवारातही शेअर करू नये. गुप्तता पाळली पाहिजे. कुणी फोनवरून मागितल्यास खडसवून बोला.” अशोकशिंदे, निवृत्तबँक अधिकारी