आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बीएमआयटी’त अप्सरा; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व देसाई यांनी साधला संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- फ्रेंडशिप डेचे सेलिब्रेशन करण्यात वावगे काय? या निमित्ताने आपणास संवाद साधता येतो, आपली मैत्री अधिकाधिक गहिरी करता येते, असे मत ‘अप्सरा’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने व्यक्त केले.

ब्रह्मदेवदादा माने अभियांत्रिकी महाविद्यालयात (बीएमआयटी) झालेल्या कार्यक्रमात सोनालीने मते माडंली. ‘लक्ष्य 2013-14’कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण तिच्या हस्ते झाले. अभिनेता मंगेश देसाई म्हणाला, ‘मैत्री जपा, आयुष्यात ती खूप महत्त्वाची असते. निस्वार्थ मित्र मिळणे ही खूप भाग्याची बाब आहे.’

सोनालीने झपाटलेला-2 चित्रपटातील ‘काळजात मुक्काम केला’ या लावणीवर नृत्य सादर केले. ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा’ यावरही नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांचे अनेकविध कलाप्रकारांचे सादरीकरण झाले. सुमित शिवशरण याने सादर केलेले लावणीनृत्य विशेष आकर्षण ठरले. या वेळी मंगेश देसाईने स्टेजवर येऊन विशेष प्रोत्साहन दिले.

संचालिका जयर्शी माने, पृथ्वीराज माने, स्नेहल माने, प्राचार्य डॉ. एम. एस. पवार, प्रवीण माने, राहुल माने, ‘डीएसके’चे सुनील कुलकर्णी उपस्थित होते. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.