आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात उधाणलेल्या तरुणाईकडून फ्रेन्डशिप डे जल्लोषात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मैत्री अधिक दृढकरण्यासाठी रविवारी अवघी तरुणाई आतुरलेली दिसली. मैत्र दिनाचे निमित्त साधून ती अधिकच वृद्धिंगत करण्यासाठी ही तरुणाई विविध मार्गाने साजरे करण्यात रमलेली दिसली. संगमेश्वर महाविद्यालयातील बीबीए विभागात खास व आगळा मैत्रीदिन साजरा झाला. पीआरएस इव्हेंट द्वारे प्रांजली, रश्मी आणि शाबाज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत निखळ मैत्री जपण्याचा खास मंत्र विद्यार्थ्यांना दिला. यानिमित्त खास कार्यक्रम आयोजिला होता.

मैत्री विषयावरील चित्रपट क्लिप्स, विविध गेम शो, फॅशन शो आदी भन्नाट कार्यक्रम यानिमित्त घेण्यात आले. संयोजक प्रांजली हेमाडे, रश्मी घाटे आणि शाबाज बागवान यांनी मैत्रदिनाचे हटके कार्यक्रम घेतले.

मित्रांच्या विविध ग्रुपने शहरातील विविध कॅम्पसजवळ, बागेत तसेच आइस्क्रिम आणि भेळ गाड्यांवर मैत्र दिनाचे उत्साही असे छोटेखानी कार्यक्रम घेतले. उत्साहाने एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधले. हेरिटेज गार्डनमध्ये सायंकाळी सशुल्क डी जे पार्टी घेण्यात आली.

याला शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेत मैत्रदिन साजरा केला. झाशीच्या राणीच्या पुतळय़ाला साक्ष ठेवत काही विद्यार्थिंनींनी एकत्रित जमून फ्रेंडशिप बँड बांधले.