आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैत्रीला स्पेशल बनवण्याचा दिवस आला दोन दिवसांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट अवघी तरुणाई पाहतेय. सुटी मिळेल म्हणून नाही तर ‘फ्रेंडशिप डे’ आहे म्हणून. आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणीला ‘विश’ करण्याचा हा दिवस. यानिमित्ताने अनेकविध गिफ्ट, फ्रेंडशिप बॅंड, मग, भेटवस्तू, ग्रिटिंग कार्ड, स्क्रोल, फ्रेंडशिप डायरी, टेडीबेअर यांनी दालने सजली आहेत.

‘फ्रेंडस् फॉरएव्हर’ असे लिहिलेले रिस्ट बॅण्ड पाच रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. रबर बॅण्ड, पट्टी, मण्यांचे बॅण्ड इतकेच नव्हे तर फ्रेंडशिपचे लेदर बॅंण्डही उपलब्ध आहेत. ‘जिवलग मित्रा.. तुझ्यासाठी काय पण’ असे लिहिलेले स्क्रोल 100 ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ‘फ्रेंडशिप कॉफी मग’ देणे हे अनेकांची आवडते गिफ्ट बनले आहे. याशिवाय ग्रिटिंग कार्ड तर आहेतच. टेडी बेअर 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी..
वर्षानुवष्रे नाहीतरी मैत्री असतेच. पण ती साजरी करण्याचा हा अनोखा दिवस. हा डे स्पेशल पद्धतीने अनेकजण साजरे करतात. दरवर्षी आपल्या मैत्रीला जागवित असतात. हा डे अनोखा आहे. नालंदा दुड्डे, सोलापूर

मैत्रीला जागविणे, तिला स्पेशल बनविणे यासाठी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मला वाटते की जुन्या मैत्रीला पुन्हा ताजेतवाणे बनविणे या ‘डे’मुळे शक्य होते. ऋतुजा माने, वालचंद महाविद्यालय

जुनी मैत्री नव्याने सुरू करण्यासाठी, तिला उजाळा देण्यासाठी, मैत्रीची भावना अधिक घट्ट करण्यासाठी हा फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप बँड, छोटीशी गिफ्ट या डे ला अधिक स्पेशल बनविते. पूजा चवरे, वालचंद अभियांत्रिकी

यंदा फेंड्र अवॉर्ड, विविध की-चेन, स्क्रोल, मैत्र संदेश देणारे मग यांना चांगली मागणी आहे. प्रत्येक नात्याचे डे साजरे होतात. फ्रेंडशिप डे हा प्रत्येकाचा आवडीचा डे बनला आहे. भास्कर मस्के, संचालक, आर्चिज