आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फ्रेंडशिप डे’च्या पूर्वसंध्येला मैत्रीच्या हिंदोळ्यावर थिरकली तरुणाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शनिवारच्या कातरवेळी सोलापूरच्या तरुणाईची पावले हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे असलेल्या मराठा मंदिरकडे वळली. यातील प्रत्येकजण नटून थटून तयार होता. निमित्त होते फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला आयोजित डीजे नाइटचे. संध्याकाळी सात वाजता डीजे लाइट्स आणि डिस्को लाइट्स चमकू लागले. कार्यक्रमाला सुरुवात झाली. बेधुंद तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. सुमारे 300 मित्र मैत्रीच्या हिंदोळ्यावर थिरकले.

शशांक शेरला या तरुणाने फ्रेंडशिप डे निमित्त सर्व मित्रांनी एकत्र यावे. नाचावे, बागडावे, धमाल मस्ती करावी. सारं काही विसरून फक्त एन्जॉय करावे, या हेतूने या डीजे नाइटचे आयोजन केले होते. मित्रांच्या घोळक्यात त्याने मैत्रीचा उत्सव साजरा केला. रात्री 9 पर्यंत डीजे चालू होता. रंगीबेरंगी लाइटस, मध्येच येणारे स्मोकर, तरुणाईचा सळसळता उत्साह यामुळे वातावरण अधिक रंगतदार बनले होते. नाचगाणी झाल्यानंतर शीण घालवण्यासाठी स्पॉन्सर असलेल्या न्यू बॉम्बे बेकरीने स्नॅक्स दिले.

मित्रा.. तुझ्यासाठी काय पण !
ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे मैत्रीदिन. जीवलग मित्राला किंवा मैत्रिणीला विश करण्याचा दिवस.

पिवळ्या गुलाबाची फुले, गिंट्रिग्ज, फ्रेंडशिप बँड यांची जोरदार खरेदी.

शनिवारी 10 ते 15 रुपयांत मिळणारे गुलाब रविवारी 20 ते 25 ला मिळतील.

एसएमएसने अनेकांचे इनबॉक्स शनिवारीच फुल्ल झाले होते.

सगळीकडे हाच एसएमएस
ना कॉल से, ना कार्ड से, ना गिफ्टसे, ना पोस्ट से, ना ई- मेलसे, आपको दिलसे... हॅपी फेंड्रशिप डे हा अनेकांचा आवडता एसएमएस सगळीकडे फिरतोय.
तरी आपल्या जीवलग मित्रांना फ्रेंडशिप बँड बांधल्याशिवाय हा मैत्रदिन साजरा होणार नाही, हे निश्चित.

असे करण्यात येते स्वागत
फ्रेंडशिप बँड बांधून चॉकलेट गिफ्ट देणे हा विश करण्याचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. विश केल्यानंतर पार्टी उकळणे किंवा मस्त पिच्चर टाकणे हा उपक्रम अनेक ग्रुप करतात. एकत्र जमल्यानंतर आइस्क्रीम पार्टी तर होतेच. एकूण काय तर विविध मार्गाने मैत्रदिन साजरा होणार. तेव्हा सज्ज राहा, मैत्रदिनाचे स्वागत करायला.