आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधाणलेल्या तरुणाईचा उत्साही दिवस, फ्रेंडशिप डे ची उत्सुकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ऑगस्टच्या पहिल्या रविवारी तरुणाई ज्या दिवसाची वाट पाहात असते तोच हा दिवस. फ्रेंडशिप डे. हातावर म्हणजे मनगटापासून ते कोप-यापर्यंतचे हात भरून फ्रेंडशिप बँड बांधून घेणारी तरुणाई पाहिली की त्यांच्या उत्साहाने थक्क व्हायला होते. या डे निमित्त एकमेकांना बँड बांधून मैत्रीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही तरुणाई, तिचा उत्साह पाहता या उत्सवाचा इव्हेंट कधी बनला काही समजलेच नाही. उद्या रविवारीही या डे ची खास धूम सोलापुरातही अनुभवयाला मिळेल, हे नक्की.
युवकांमध्ये उत्साह
भारत, मलेशिया, बांगलादेशासह विविध फुले, भेटवस्तू, कार्ड देऊन किंवा बँड बांधून मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशीप डे. वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघात 30 जुलै रोजी हा दिवस साजरा होत असतो. मात्र, भारतासह बांगलादेश, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा साजरा करतात. मुख्यत: युवक वर्गाद्वारे हा दिवस साजरा करण्याची धूम असते. सगळ्यात जवळचा असणा-या मित्राच्या हातावर बँड बांधून किंवा भेटकार्ड देऊन त्याला हॅपी फे्रडशीप डे म्हणत आपल्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर होत्या नाने अन्नान
अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा होत असला तरी नेमके या दिवसाची सुरवात कशी व कधी झाली याचा उलगडा होत नाही. संयुक्त राष्टÑसंघाचे सचिव कोफी अन्नान यांच्या पत्नी नाने अन्नान या 1998 मध्ये फ्रेंडशीप डेच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसडेर झाल्या होत्या.
इतिहास
हॉलमार्क कार्डचे संस्थापक जॉसी हॉल यांनी फ्रेंडशिप डे साजरा करण्यास प्रोत्साहन दिले. 2 ऑगस्ट 1930 रोजी एकमेकांना विश करण्याचा उपक्रम झाला. कारण या दिवशी रविवारची सुटीही होती. हेच निमित्त साधण्यात आले. या मागे कार्ड विक्रीचे गमक होते.
बँडची क्रेझ
फ्रेंडशिप बँडची क्रेझ आहे. दोन ते 20 रुपयांपर्यंतच्या बँडला मागणी असते. खूप सारे मित्र मैत्रिणींना बँड बांधायचा असेल तर चक्क रीळच मिळतो. तो 20 ते 40 रुपयांना मिळतो. एका रीळमध्ये किमान 20 जणांना तरी बँड बांधून कायमच्या मैत्रीबंधनात बांधून ठेवता येते.
मैत्री तरी कमाविली पाहिजे. श्रद्धा हुल्लेनवरू, वालचंद महाविद्यालय, एमएसडब्ल्यू 1

आमचा जवळपास 40 जण मित्रमैत्रिणींचा मस्त ग्रुप जमलाय. प्रत्येकच रविवारी वालचंदच्या कॅम्पस कट्ट्यावर आम्ही एकत्रित येतो. कित्येकांना वाटते यार जणू वरातच निघालीय की काय ! उद्या तर फ्रेंडशिप डे. बँड बांधून धम्माल होणार. मैत्री अधिक घट्ट, गहिरे करण्याचा हा दिवस. युवा महोत्सव जवळ आलाय, आम्ही त्यानिमित्त एकमेकांचे मित्र बनतो. महोत्सव संपला तरी आमच्यातील मैत्री संपत नाही. ती अधिकच गहिरे होते. म्हणूनच म्हणते की आयुष्यात काही नाही कमावले तरी चालते, मैत्री कमावली पाहिजे. जेव्हा तुमच्याजवळ काहीच असणार नाही तेव्हा या मैत्रीची श्रीमंती मात्र तुमच्याकडे नक्की असेल.