आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From 9 June Guru Set; A Month No Date For The Marriage

9 जूनपासून गुरूचा अस्त सुरू; महिनाभर लग्नांना मिळणार नाही मुहूर्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेले एक ते दीड महिन्यापासून असलेल्या लग्नसराईच्या धामधुमीला गुरूच्या अस्तामुळे महिनाभर ‘ब्रेक’ लागणार आहे. जुलैमध्ये लग्नाचे तीनच मुहूर्त आहेत. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी लग्नतिथी कमी होत्या. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नाचे ठरावीक मुहूर्त होते. त्यामुळे मे महिना लग्नसराईसाठी धावपळीचा होता. जिल्ह्यासह शहरात एक ते दीड महिन्यापासून लग्नसराईची धूम सुरू आहे. यंदाच्या वर्षातील केवळ तीनच मुहूर्त आता शिल्लक राहिले आहेत.

ठरावीक दिवसात लग्नसमारंभ अधिक असल्यामुळे महिनाभर पुरोहित मिळणे जीकरीचे होते. या महिन्यात 9 जूनपासून गुरूचा अस्त सुरू होत आहे. सहा जुलैला गुरुउदय तर, पुन्हा 8 जुलैपासून मार्गी असेल. हा काळ विवाहासाठी शक्यतो अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात विवाह होत नाहीत, असे जाणकार पुरोहितांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुरूच्या अस्तापूर्वीच विवाह उरकण्याची धावपळ सुरू आहे.


तीनच विवाह मुहूर्त
गेल्या आठवड्यात 27, 29, 30 मे, 2 आणि 3 जून रोजी विवाह मुहूर्त होते. आता यंदाच्या लग्नसराईतील 11, 14 आणि 15 जुलै हे तीनच मुहूर्त शिल्लक आहेत. याशिवाय विविध पंचांगानुसार आणखी एखाद दुसरा विवाह मुहूर्त आहे. 19 जुलैला आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाला प्रारंभ होतो. या काळात शक्यतो विवाह होत नाहीत. त्यानंतर थेट 18 नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त सुरू होणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्यातील मुहूर्तांसाठी वर्‍हाडी मंडळींची लगीनघाई सुरू आहे.


पंचांगानुसार तिथी
उत्तर महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यांमध्ये दाते पंचांगानुसार विवाह मुहूर्त व अन्य धार्मिक विधी केले जातात; मात्र रुईकर पंचांगानुसार विधी करणार्‍यांची संख्या मोठी असल्याने काही वेळेस अडचण पाहता नागरिकांच्या सोईनुसार या पंचांगाचा वापर करून काही मुहूर्त काढून शुभकार्य साधता येते.


लग्नसराईला ब्रेक
यंदा ठरावीक होते मुहूर्त; मे महिन्यात झाली धावपळ, एक महिन्यापर्यंत असेल गुरूच्या अस्ताचा कालावधी, शिल्लक राहिलेत केवळ तीनच मुहूर्त आपल्याकडे दाते पंचांगानुसार धार्मिक विधी केला जातो; मात्र दाते, रुईकर, लाटकर आणि राजंदेकर यांच्या पंचांगातील वेगवेगळय़ा तारखांच्या बदलामुळे नागरिक संभ्रमात आहेत. पुढील महिन्यात गुरूचा अस्त आल्यामुळे हा काळ विवाहासाठी योग्य नाही. प्रत्येक ग्रहाच्या उदय आणि अस्ताला कोणतेही शुभकार्य केले जात नाही. दरम्यानच्या काळात अडचणीचे प्रसंग असतील आणि विवाहकार्य करणे अनिवार्य असेल तर अस्तंगत ग्रहाची शांती, प्रतिमापूजन करून विवाहकार्य करावे.’’ पंकज महाराज कुलकर्णी, ज्योतिष पंडित