आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारपासून मिलिंद व्याख्यानमाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक विचार मंचतर्फे शनिवारपासून (दि. ११) मिलिंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शांतीकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवार ते मंगळवारपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्याने सुरू होतील. व्याख्यानमालेचे यंदा १६ वर्षे आहे. शनिवारी महात्मा फुले यांच्या ११८ व्या जयंतीचे औचित्य साधले आहे. महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन होईल.

शनिवारी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि जागतिकीकरण’ या विषयावर व्याख्यान होईल. रविवारी (दि. १२) डॉ. प्रशांत पगारे (मुंबई) हे ‘भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी’ या विषयावर बोलतील. यावेळी डॉ. अशोक शिलवंत वरिष्ठ भू वैज्ञानिक दिवाकर धोटे यांची उपस्थिती असेल. सोमवारी (दि. १३) प्रा. आशालता कांबळे (मुंबई) यांचे ‘फुले आंबेडकरी चळवळीसाठी स्त्रियांचे आदर्श’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या संचालिक प्रा. अपर्णा कांबळे सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त मनिषा फुले यांची प्रमुख उपस्थिती असेल.

मंगळवारी (दि. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी भन्ते डॉ. खेमधम्मो (मुळावा) यांचे ‘मानवी जीवनात बोधीसत्वाने पूर्ण केलेल्या पारमिता’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे (बीड) अर्थतज्ज्ञ डॉ. गिरीश जाखोटिया यांची प्रमुख उपस्थिती असेल. याप्रसंगी डॉ. जाखोटिया यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर २१ वे शतक’ डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी लिहिलेल्या ‘माता रमाई’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले. या पत्रकार परिषदेला अनिल जगझाप, श्रीकांत गायकवाड, अरविंद माेरे, सुधीर चंदनशिवे आदी उपस्थित होते.