आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून शहरात माल आवक होणार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात सोलापुरात पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सिद्धेश्वर कापड मार्केट येथे व्यापार्‍यांची बैठक झाली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य मालाची सोमवारपासून आवक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 एप्रिलपासून बेमुदत बंद आहे. त्याबाबत रूपरेषा ठरविण्यासाठी 19 किंवा 20 एप्रिल रोजी व्यापार्‍यांची पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे प्रभाकर वनकुद्रे यांनी दिली.

एलबीटीच्या विरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत आढावा घेण्यासाठी सोलापुरात व्यापार्‍यांची बैठक झाली. यावेळी विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एलबीटी आंदोलनात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोल्हापुरात एलबीटीच्या विरोधात आंदोलन करताना व्यापारी महासंघाचे संचालक बाळासाहेब घाटे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते मरण पावले. सोलापुरात त्यांना श्र द्धांजली वाहण्यात आली. यावेळी राजू राठी, इंदरलाल होतवानी, महेंद्र कटारिया, अरविंद चिंता, मधुकर मेलगिरी, निलेश पाटील, शहाजी खटके, गुरुनाथ करजगी, संजय कंदले, विजय चौधरी आदी व्यापारी उपस्थित होते.


रोज 40 ते 50 लाख रुपये मालाची आवक
व्यापारी एलबीटीचे विवरणपत्र न भरल्याने रोज शहरात किती मालाची आवक होते याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात रोज सुमारे 40 ते 50 लाख रुपये मालाची आवक होते, असे सांगण्यात आले.