आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारपासून हेल्मेट सक्ती राहीलच, पोलिस आयुक्तांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अपघातानंतर जीवितहानी टाळण्यासाठी हेल्मेट सुरक्षित आहे. अपघातात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून बुधवारपासून हेल्मेट सक्ती होणार आहे. नागरिकांमध्ये याबाबत संभ्रमावस्था आहे. बाजारात आवश्यकतेनुसार हेल्मेट मिळत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. या सर्व बाबींवर हेल्मेट सक्ती बुधवारपासून राहील. पोलिस त्या दिवशी शक्यतेनुसार कारवाईचा बडगा उचलतील, असे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर म्हणतात. दुचाकीवरून जाताना चालक पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, काहीजण नियम पाळत नाहीत अथवा पोलिसही त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. अपघात टाळण्यासाठी आणि अपघात कुणावर बेतू नये म्हणून हेल्मेट सक्तीचे आहे.

न्यायालय काय म्हणते
सर्वोच्चन्यायालयाच्या आदेशानुसार कलम १२९ इंडियन मोटार अॅक्ट १९९८ अन्वये हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. ज्या शहारात पोलिस आयुक्तालय आहे त्या ठिकाणी ही सक्तीच आहे असे नमूद आहे. याबाबात कर्नाटकातील बेळगावमध्ये याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले होते.

युवक संघटनेची मागणी
शहरातवन-वे मार्गाचा बोजवारा आहे. अतिक्रमण वाढल्यामुळे वाहने चालवता येत नाहीत. कुणीही चुकीच्या दिशेने येतो. बेशिस्तपणा संपवून शिस्त आणा, प्राथमिक सुविधा द्या, मगच हेल्मेट सक्ती करा, असे पत्रक वंदे मातरम् युवक संघाने प्रसिद्धीस दिले आहे. संघाचे प्रमुख श्याम खंडेलवाल यांनी हे निवेदन पोलिस आयुक्तांना दिल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...