आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणांचा आनंदोत्सव: फुगडी, झिम्मा, फेरचा खेळ रंगला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील अनेक मंडळाच्या महिलांनी नागपंचमीनिमित्त रविवारी सायंकाळी एकत्र येत फुगडी, बस फुगडी, झिम्मा, फेर, खिस बाई खिस, लाटणे, नाच गं घुमा, अडगुलं मडगुलं, सुपाचे फेर आदी खेळांचा आनंद घेतला. सकाळपासून ठिकठिकाणी उंचच्या उंच झोक्यांवर युवती व महिला हिंदोळे घेत होत्या.

विठ्ठल मंदिर येथे ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. महिलांनी नऊवारीत पारंपरिक पद्धतीने वारूळाचे व नागदेवतेचे पूजन करून खेळास सुरुवात केली. रेशीम वस्त्रे, हाती सजलेली लालबुंद मेंदी, चमचमणार्‍या रंगीत बांगड्या, नव्या दागिन्यांची नवलाई अन् ओसंडून वाहणारा उत्साह चेहर्‍यांवर होता. काही युवतींनी हौस म्हणून नागपंचमीच्या निमित्ताने नऊवारी नेसल्या.