आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funding Distribution In Solapur Municipal Corporation News

निधीवाटपात दुजाभाव, विरोधकांना शहरात २० तर सत्ताधाऱ्यांना ३० लाखांचा दिला निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराच्यासमतोल विकासासाठी समान निधी वाटपाची मागणी असताना सत्ताधाऱ्यांनी ती अमान्य केली आहे. सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनी विकास कामे सुचवली. त्यानुसार त्यास मंजुरी देण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या शहरातील नगरसेवकांना ३० लाख रुपये तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना ४० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या शहरातील नगरसेवकांना २० लाख रुपये तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिका सभा झाली.
सर्व नगरसेवकांना विकास कामांसाठी समान निधी देण्यात यावा, असे मत मनपा स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे यांनी व्यक्त केले. पण अंदाजपत्रक बहुमताने मान्य केल्याचे सांगत समान निधी देण्यास सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी आक्षेप घेतला. विरोधकांनी २० आणि २५ लाखांच्या कामाची यादी द्यावी, असे हेमगड्डी यांनी यावेळी सांगितले. समान निधी देण्याची मागणी करत विरोधकांनी महापौरांसमोर गोंधळ घातला आणि सभागृह नेते हेमगड्डी यांच्या विरोधात घोषणा िदल्या.

महिला बालकल्याणचा निधी कमी खर्चल्यावरून पुन्हा गदारोळ
महिलाबालकल्याण खात्याला तीन कोटी रुपयांचा निधी असताना केवळ १.२८ कोटी रुपये खर्च केले. तेथील अधिकारी ५० हजार वेतन घेतात पण निधी खर्ची टाकत नाहीत, असा आरोप नगरसेवकांनी केली. यावेळी नगरसेवक अनिल पल्ली, आनंद चंदनशिवे, कुमूद अंकाराम, राजकुमार हंचाटे, मधुकर आठवले आदींनी मत व्यक्त केले.

सात विषय समित्यांसाठी ६३ जणांची िनवड
वेगवेगळ्यासात विषय समित्यांवर प्रत्येकी याप्रमाणे ६३ नगरसेवकांची िनवड सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार करण्यात आली. काँग्रेस चार, राष्ट्रवादी काॅंग्रेस एक, भाजप दोन, शिवसेना एक तर बसपा-माकपा एक याप्रमाणे निवड झाली.
विषय समित्यांचे अधिकार अबाधित राहावेत
^ज्यात्या समितीच्या मान्यतेनेच स्थायी समिती किंवा मनपा सभागृहाकडे पाठवले जावेत. त्यामुळे त्या समित्यांचे अधिकार अबाधित राहतील. महिला बालकल्याणचा यावर्षीचा निधी योग्य प्रकारे खर्चण्याचे नियोजन करा.''
सुशीलाआबुटे, महापौर

समान निधी वाटप करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर यांच्या हौदासमोर जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
कोण काय म्हणाले...
आयुक्तपदी गुडेवार असताना समान निधी दिला, त्यानुसार द्या. - सुरेशपाटील
दमदाटीकरणाऱ्यांना जास्त निधी मिळतो. - रोहिणीतडवळकर
समाननिधी देण्यात अडचण काय? - आनंदचंदनशिवे
समतोलिवकासासाठी समान निधी द्या. - प्रा.अशोक निंबर्गी
अंदाजपत्रकासविरोध करता तर समान निधी कसे देणार ? -संजय हेमगड्डी
गुरुवारी महापालिका सभागृहात आलेले विषय
झाडूवाले महिला स्वयंरोजगार संस्थेमार्फत घेणे.
मंगळवार बाजारातील हुतात्मा कुर्बान हुसेन हाॅल शुभकार्यास भाड्याने देणे.
इंचगिरी मठासमोरील चौकास सेवालाल चौक नाव देणे.