आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरकी फिरकी: बारा"मती' गुंग, पवारांचे नमो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान जाहीर केले, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनाही हे अभियान इतके भावले की, बारामतीत त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. यावर प्रतिक्रिया येणार नाहीत तर काय ?
एकजण म्हणाला, मानले पाहिजे. सॉलीड गेम. पवारांची चाल यशस्वी होणार. बारामती येथे समस्त पवार कुटुंब या स्वच्छता अभियानासाठी रस्त्यावर उतरले होते. पवारांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वच्छता केली गेली. नंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार तसेच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर साफसफाई केली. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
एका नेटिझन्सने चक्क भविष्यातील घटना काय घडू शकतील,

अशी भविष्यवाणी वर्तवली

१) डिसेंबर २०१४ : नागपूरलापवार संघाच्या गणवेशात मोहन भागवतांना भेटणार, भागवत पवारांच्या दूरदृष्टी आणि भारताच्या ब्लू प्रिंटची तारीफ करणार
२)जानेवारी २०१५ : राष्ट्रवादीएनडीए मध्ये दाखल. केंद्रात प्रफुल्ल पटेल नागरी उड्डान मंत्री पवार कृषिमंत्री
३)मे २०१५ : महाराष्ट्रविधानसभेत शिवसेनेचा अविश्वास प्रस्ताव, राष्ट्रवादीचा सरकारमध्ये सहभाग. अविश्वास प्रस्ताव खारीज होणार.
४) अजित पवार उपमुख्यमंत्री. पाटबंधारे महसूल खाते राष्ट्रवादीकडे
५)मार्च २०१९ : लोकसभेच्यानिवडणुकीत एनडीएला दोन तृतियांश बहुमत - पवार उपपंतप्रधान
६)१५ ऑगस्ट २०१९ : मोदींचेराष्ट्राला उद्देशून भाषण - मुद्दे - भ्रष्टाचार निर्मूलन . बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या , काळा पैसा परत आणणे. (रिपीट टेलिकास्ट फ्रॉम १५ ऑगस्ट २०१४).