आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मभूमी पुण्यात होणार महर्षी शिंदे अभ्यासकेंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अभ्यास केंद्र सोलापुरात नुकतेच सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर पुणे येथे केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गो. मा. पवार यांनी दिली. वंचितांसाठी काम केलेल्या थोर महर्षी शिंदे यांचे जन्म गाव व कार्य भूमी पुणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संशोधनपर ग्रंथांमधून महर्षींचा साकल्याने परिचय करून देणार्‍या डॉ. पवार यांचा सोमवारी 81 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ते ‘दिव्य मराठी’शी बोलत होते. पत्नी सुजाता पवार उपस्थित होत्या. दरम्यान, दिवसभर त्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दूरभाषवरूनही अनेकांनी शुभसंदेश दिले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, र्जमनीच्या हेडलबर्ग विद्यापीठातील प्रा. स्वराली परांजपे, प्रा. राघवेंद्र व मीरा मानवी, ज्येष्ठ समीक्षक मकरंद साठे, सतीश बडवे, दिगंबर पाध्ये, शिलालेखांचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद कुंभार, माजी खासदार धर्मण्णा सादूल, आमदार दिलीप माने, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, लक्ष्मीनारायण बोल्ली, भीमराव जाधव व कुटुंबीय, डॉ. राजा ढेपे, प्रा. सुलभा पिशवीकर, प्रा. पुष्पा आगरकर, दत्ता गायकवाड, अँड. श्री. व सौ. नीला मोरे, रेल्वेचे विभागीय जनसंपर्क अधिकारी सुशील गायकवाड, प्रा. सुनील रसाळे, प्रा. रणधीर शिंदे, प्रा. राजशेखर शिंदे, प्रा. संतोष कोटी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

केंद्राचे कार्य असे
पुणे येथील केंद्राविषयी डॉ. पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे, र्शी. खोरे आणि उल्हास पवार यांनी केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे. महर्षींचे विचार व कार्य यांचे संशोधनास प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र करणार आहे. त्यासाठी चर्चासत्र, परिषदा, व्याख्याने आयोजित केली जातील. केंद्राच्या मार्फत पुस्तिका व ग्रंथ प्रकाशनाचेही काम होणार आहे. पुढच्या पिढीपर्यंत महर्षींचे विचार व जीवनकार्य पोहोचवण्यासाठी केंद्र प्रयत्नशील असेल.