आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गड्डा यात्रेत आहे तरुणाईचा बहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत तरुणांचा सहभाग लक्षणीय असतो. गड्डा यात्रेतही तरुणाई विविध स्टॉलवर रमलेली दिसून येते. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत गड्डा यात्रेत ५० टक्क्यांइतका वावर युवा गटाचा असल्याचे दिसून येते.

विद्युत पाळण्यापासून विविध खाद्य पदार्थांच्या स्टाॅलवर आनंदचा बहर दिसून येतो आहे. दिल्ली के पापडपासून बुढ्ढी के बाल पर्यंतच्या विविध स्टॉलवरही ती जशी दिसून येते, तसे कृषी प्रदर्शनापासून विविध उपक्रमातही ती रमलेली दिसून येते आहे. यात्रा सहकुटुंब आणि मित्रपरिवारासाठी आनंदाची पर्वणीच असल्याची भावना अनिल भरले यांनी व्यक्त केली. करमणुकीचे आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत, मात्र बजेटचा विचार केला तर बऱ्यापैकी पॉकेट रिकामे होते, असे संतोष पाटील यांनी सांिगतले.

होम मैदानावर गड्डा यात्रा भरली आहे. विविध वस्तू आणि करमणुकीच्या दालनांमध्ये गर्दी होत आहे. रविवारी टिपलेले छायाचित्र.