आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पादुका दर्शनाची आज ‘उपलप’ येथे सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेगावच्या श्री गजानन महाराज पालखीचे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास तुळजापूर वेस, पाणी गिरणी चौक येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. गुरुवारी सकाळपासून ‘श्रीं’च्या दर्शनाची सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी प्रारंभी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी दिंडीचे स्वागत केले. गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. पालखी स्वागतानंतर महापालिकेच्या वतीने वारक-यांना साबुदाणा चिवड्याचे पाकीट वाटण्यात आले.

तीन अश्वांसह वारकरी, टाळकरी, पताकाधारक आणि सेवेकरी ‘गण गण गणात बोते’च्या गजरात श्री गजानन महाराज पालखी घेऊन पंढरीची वाट चालत आहेत. बुधवारी रात्री कुचन प्रशालेत पालखीचा मुक्काम होता. गुरुवारी सकाळी पालखीचे उपलप मंगल कार्यालयात आगमन होईल. येथे पालखी आणखी एक दिवस मुक्कामाला असेल. उपलप मंगल कार्यालयात गुरुवारी दिवसभर भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे. सोलापुरातून शुक्रवारी सकाळी पालखी तिºहेमार्गे पंढरपूरकडे रवाना होईल. यंदा प्रथमच पालखीसमवेत गजराणी नाही. त्यामुळे पालखीसमोर गजमुखाचे प्रतीक, सनई चौघड्यांचे पथक आहे.

यांची होती उपस्थिती
नगरसेविका राजश्री कनके, नागेश वल्याळ, संजय कनकी, अविनाश पाटील, इंदिरा कुडक्याल, माजी आमदार निर्मला ठोकळ, परिवहन समिती सदस्य आनंद मुस्तारे, अग्निशामक दल प्रमुख केदार आवटे, सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राथमिक शिक्षण मंडळाचे उपसभापती गोवर्धन कमटम, पक्षनेते पांडुरंग चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे, विभागीय अधिकारी एम. बी. सांगलीकर, अतुल भालेराव, उपअभियंता लक्ष्मण चलवादी, सहाय्यक उद्यानप्रमुख अजय चव्हाण, स्वीय सहाय्यक उमेश माने, सुधीर महिंद्रकर, स्वातंत्र्यसैनिक रमेश जाधव आदींसह गजानन पालखीचे सेवेकरी सुनील कुलकर्णी, संजय क्षीरसागर, सुनील फाळके, वारकरी, भक्तगण उपस्थित होते.
पालखीचे स्वागत करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम व पोलिस आयुक्त प्रदीप रासकर