आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन महाराज पादुका दर्शनासाठी दिवसभर गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेगावच्या श्री गजानन महाराज पालखीचे बुधवारी सोलापुरात आगमन झाल्यापासून शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी सकाळपासून उपलप मंगल कार्यालयात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. बुधवारी पादुका दर्शनासाठी कुचन प्रशालेत भाविकांनी गर्दी केली होती. तेथे विसावा होता. कुचन प्रशालेत सायंकाळी सात वाजता आरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी सात रस्ता येथे पादुकाच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. ही पालखी शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

पालखी सोहळ्याचे स्वागत
प्रभाग क्रमांक दोनतर्फे भवानी पेठ मड्डी वस्ती शांती नगर येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सुधीर सुरवसे मित्र परिवाराने वारक-यांना प्रसादाचे वाटप केले. नगरसेविका राजश्री कणके, नगरसेवक अविनाश पाटील, नागेश वल्याळ, माजी नगरसेवक शंकरराव मुधोळकर, कुंदन भुजबळ, अमोल कळंब, संध्याताई भुजबळ, भामाबाई ईम्रापुरे, गणेश बंडगर, दिनेश वडणे, शंकर कुंभार, सुधीर सुरवसे आदी उपस्थित होते.
फोटो - सोलापूर. शेगावच्या श्री गजानन महाराजांची पंढरीकडे निघालेली पालखी शहरात दाखल झाली आहे. गुरुवारी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात पालखी विसावली होती होती. श्रींच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती. छाया : दिव्य मराठी