आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन मेहेंदळे यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज युनियनचे निमंत्रक गजानन हरी मेहेंदळे (वय ६३) यांचे गुरुवारी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना कर्करोग होता. उपचार सुरू असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा तेजस आणि मुलगी डॉ. रसिका कुलकर्णी (पंढरपूर) असा परिवार आहे. (कै.) मेहेंदळे बँक ऑफ इंडियातून िनवृत्त झाले. त्यानंतरही त्यांची संघटनेशी असलेली नाळ तुटली नाही. कर्मचा-यांच्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रभागी असत.

कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी ते गेली काही महिने लढत होते. मार्चमध्ये झालेल्या या आंदोलनाची दखल व्यवस्थापनाला घ्यावी लागली. संघटनेशी वाटाघाटी झाल्या. या प्रक्रियेत श्री. मेहेंदळे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या िनधनाने बँक कर्मचा-यांचा मोठा आधारवड कोसळल्याची भावना कर्मचा-यांनी व्यक्त केली.