आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गाणे मंगेशाचे' या मधुरिमा क्लबच्या उपक्रमास प्रेक्षकांची भरभरून दाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गोमू संगीतनं माझ्या तू येशील का ?, जब से तेरे नयना मेरे नयनोंसे लागे रे, मन उधाण वार्‍याचे, गोर्‍या गोर्‍या गालावरी, अशा मधुर गीतांनी मंगेश बोरगावकर आणि सावनी रवींद्र यांनी उपस्थितांनी मंत्रमुग्ध केले. तसेच राहुल इंगळे यांच्या विनोदालाही भरभरून दाद मिळाली. निमित्त होते ‘दिव्य मराठी’ मधुरिमा क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या ‘गाणे मंगेशाचे’ या गीतसंगीत कार्यक्रमाचे.

शुक्रवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. किलरेस्कर सभागृहात आयोजित केलेल्या गीतसंगीतने मधुरिमा क्लबच्या पहिल्या उपक्रमाची सुरुवात झोकात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन मधुरिमा क्लबच्या मानद सभासद सीमा किणीकर, अंबिका जेऊरकर, ललिता रांका, निर्मला मठपती, लता ढेरे व ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड टिंकेश ग्यामलानी यांच्या हस्ते करण्यात आले. या संगीतमय आणि विनोदी कार्यक्रमाने मधुरिमा क्लबच्या सदस्यांना एक अनमोल भेट दिल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

संगीत सभेची सुरुवात मंगेश बोरगावकर यांनी पांडुरंगाच्या अभंगाने केली. सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या गोर्‍या गोर्‍या गालावरी, मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, या गीतांना वन्स मोअर मिळाले. या वेळी ऑक्टोपॅडवर अजय अत्रे, तबला-ढोलकी विक्रम भट, सिंथेयाझरची साथ अमृता दिवेकर व कल्याण कवडी, तर गिटारची साथ राहुल रणशृंगारे यांनी दिली. पल्लवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग मॅनेजर नितीन बर्‍हाणपुरे व शाल्मली चिडगुपकर यांनी पर्शिम घेतले.

सभासदांची दाद
जब से तेरे नयना, या गीताने सभागृहात एक वेगळेच चैतन्य खुलविले. या वेळी महिलांनी शिट्टय़ा नृत्य अन् टाळ्यांचा प्रतिसाद दिला. विनोदवीर राहुल इंगळे यांच्या विनोदी किश्श्यांनाही महिलांनी हास्याचे फवारे उडवत दाद दिली.