आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

114 मंडळांच्या गणरायांची मिरवणुकांनी प्रतिष्ठापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोमवारपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला शहरात जल्लोष आणि भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. जवळपास 1351 सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवात भाग घेतला. त्यातील 114 मंडळांनी मिरवणुका काढल्या.

सकाळी सात वाजल्यापासूनच गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या. सकाळच्या मुहूर्तावर आज घराघरांत गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाच्या गणेशमूर्तींच्या किमतीही वाढलेल्या दिसल्या. साधारणता 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या घरगुती प्रतिष्ठापनेच्या मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. हारांच्या किमतीही आज दुपटीने वाढल्या. इतरवेळी पाच ते सात रुपयांना मिळणारा हार आज 15 ते 20 रुपयांना मिळत होता. शहरातील रस्ते सोमवारी दिवसभर मिरवणुकांनी गजबजून गेलेले होते. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांमध्ये आज कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. महिलांचे ढोल, ताशा वाद्यांचे पथक होते. महापौर अलका राठोड यांच्या हस्ते गणेशमूर्तीची पूजा झाली. त्यानंतर महापौरांनीही ढोल वाजवून आनंद द्विगुणीत केला. सिद्धेश्वर मंदिराजवळील गणपती घाट येथील मंदिरातही आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हिप्परगा येथील र्मशुम गणपती मंदिरातही धार्मिक कार्यक्रम सुरू झाले.

मानाचे बाप्पाही विराजमान
आजोबा गणपती, कसबा गणपती, ताता गणपती, बालाजी मंदिर हे मानाचे गणपती आज विराजमान झाले.