आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अथर्वशीर्ष : चित्रकलेच्या अभिव्यक्तीसह संक्षिप्त भावानुवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अथर्वशीर्ष हे लोकप्रिय असे संस्कृत भाषेतील गणेशस्तवन. अथर्ववेदातील हे सूक्त प्रासादिक तितकेच चिंतनीय आहे. हे शब्दरूपातील गणेशस्तवन येथे चित्ररूपातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे गणेशरूप सभोवतालच्या पर्यावरणात भौमितिक रूपात जड संवेद्य रूपात, अक्षरांत, चिन्हांत, प्रतीकांत, रंगांत, निसर्गात दिसणारे आहे. ही रूपे स्तवनात असणार्‍या शब्दांना समांतर जाणारी आहेत. निराकारापासून सगुण रूपापर्यंतचा हा एकत्रित प्रवास सलगपणे रेखाटलेला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘दै. दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी हे विशेष चित्रमय सादरीकरण. संक्षिप्त भावानुवाद : पुरुषोत्तम नगरकर, चित्रांकन : शिरीष घाटे

प्रत्यक्ष तूच तत्त्व ते

तूच केवळ कर्ता

धारक तू, तू हर्ता

हे अखिल ब्रह्मच केवळ

ते तूच तू साक्षात आत्मरूप. 1

मी बोलतो यथार्थ

मी बोलतसे सत्य. 2

करी रक्षण तू माझे

चहूकडून या शिष्याचे. 3

तू वाड्मय, तू चिन्मय

आनंदमय तू ब्रrामय.

सत्-चिदानंद तू

प्रत्यक्ष ब्रrा तू.

तू ज्ञानमय, विज्ञानमय. 4

तुझ्यापासून

जग सर्व निर्माण

तुजमुळे चालते

तुजठायी विरते

तुजकडे येई फिरून.

तू भूमी, जल, अग्नी

अनिल, नभ

वाक्पदे तू चार. 5

तू त्रिगुणातीत

तू त्रिदेहातीत

तू त्रिकालातीत

मूलाधाराठायी

नित्य तू स्थित.

तू शक्तित्रयात्मक

तव ध्यानी मग्न

सर्वदा योगीजन.

तू ब्रrा, तू विष्णू, रूद्र तू

तू अग्नी, तू वायू, इंद्र तू

तू सूर्यही, चंद्र तू

ब्रrा, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग

तथा ओंकार तू. 6

ú गं गणपतये नम: । 7

आम्ही जाणतो

त्या एकदंतास

वक्रतुण्डाचे त्या

करितो ध्यान

तो दंती आम्हां

होवो प्रेरक. 8

एकदंत, चतुर्हस्त

पाशांकुशधारक

करी एका हस्तिदंत

दुजा वरदायक

रक्तवर्णी, लंबोदर

वाहन ज्याचे मूषक

ल्याला लाल वस्त्रे

असा शूर्पकर्णक.

उटी रक्तचंदनाची

लाविली अंगास

फुलांनी तांबड्या

जाहला सुपूजित

देव भक्तवत्सल

जगत्कारण अच्युत

सृष्टिपूर्वही होता,

जो पल्याड प्रकृतिपुरूषाच्या.

त्यास ध्यातो निरंतर

तो योगी र्शेष्ठतम.9

नमन देवाधिपती

नमन गणपती.

एकदंत, लंबोदर

शिवसुत, विघ्नहर

वरदमूर्ते तूज नमस्कार. 10