आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival In School And College Issue At Solapur

शाळांमध्येही बुद्धीची देवता विराजमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातीलविविध शाळांमध्ये मोठ्या जल्लोषात विद्येची देवता म्हणजे गणराज विराजले आहेत. शाळांत गेल्या दोन दिवसांपासून तयारी सुरू केली हेाती. शुक्रवारी सकाळपासून गणरायाला आणण्यासाठी विद्यार्थ्यांत मोठी लगबग सुरू होती. या वेळी विद्यार्थ्यांनी ढोल, ताशाच्या गजरात, भक्तिभावाने उत्साही वातावरणात विघ्नहार्ता गणरायाचे स्वागत केले.

कुचनप्रशाला
कुचनप्रशालेत मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. ही मिरवणूक कर्णिकनगर, पावन गणपती मंदिरपासून करण्यात आली. या वेळी मुख्याध्यािपका मीरा शेंडगे, गोपाळ मुडदिडी, संजीव बोरला, संजय मंदुरे आदींची उपस्थिती होती.
ज्ञानोदयविद्यालय

कवितानगरयेथील ज्ञानोदय विद्यालयात मुख्याध्यािपका भारती वेजवाडे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी प्रशालेचे शिक्षिका रत्नाबाई कुंभार, धेनू स्वामी आदींची उपस्थिती होती.

ज्ञानविकासविद्या मंदिर
रविवारपेठ येथील ज्ञानविकास विद्या मदिरात मुख्याध्यािपका मंदा गायकवाड यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी प्रशालेचे अमरसिंह रजपूत, निर्मला माने आदी उपस्थित होते.

जीवनिवकास विद्यामंदिर
जीवनिवकास विद्यामंदिर येथे मुख्याध्यािपका सुरया पठाण यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. शिक्षक अविनाश पाटील, पालक सदस्य मनीषा जिरगे, आयुब शेख, बाळकृष्ण भोसले आदी उपस्थित होते.

इंडियनमॉडेल स्कूल
इंडियनमॉडेल स्कूल प्रशालेत मिरवणुकीत ढोल पथक, झांज पथक, झेंडा पथक, लेझीम पथक यांचा समावेश होता. रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, कल्पना चावला अशा वेशात विद्यार्थी सामील होते. या वेळी संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यािपका अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, अचला राचर्ला अिदती कुलकर्णी आदीं उपस्थित होते.

फोटोओळ - इंडियन माॅडेल स्कूलच्या म्‍िरवणुकीत ढोल वाजवताना मुली.