आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा आले भक्तांच्या भेटीला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी बाजारपेठांमध्ये सुरू झाली. मूर्तिकारांनी बनवलेले गणपती बाप्पा भक्तांच्या भेटीला दाखल झाले. येथील काही मूर्ती तेलंगण, कर्नाटकला गेले तर नगर, पेणहून आलेल्या मूर्तींनी सोलापूरकरांचे लक्ष वेधले. कन्ना चौक, टिळक चौक, मधला मारुती येथे दुकाने सजली. सजावटींच्या सािहत्याने बाजारपेठा उजळून निघाल्या.

येत्या २९ आॅगस्टला घराघरात गणरायाचे स्वागत होईल. सार्वजनिक मंडळांचे बाप्पाही रंगकामासाठी सज्ज झाले आहेत. प्लास्टर आॅफ पॅरसिच्या या मूर्ती दिसण्यास अतशिय आकर्षक आहेत. आभूषणे, आयुधांनी त्यांना नटवण्यात आले. मोठ्या आकारातील बहुतांश मूर्ती विष्णू अवतारातील आहेत. घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी मात्र सिंहासनारूढ आणि प्रसन्न मुद्रेत बसलेल्या मूर्ती आहेत. कन्ना चौक, टिळक चौक, मधला मारुती, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक आदी बाजारपेठांत बाप्पांच्या मूर्ती आलेल्या आहेत.

वाहतूक मार्गात बदल
बाळ‌ीवेस, टिळक चौक, मधला मारुती, कन्ना चौक, राजेंद्र चौक या मार्गावर मूर्तीं विक्रीची दुकाने थाटल्याने महापालिकेच्या परविहन उपक्रमाकडील बसच्या मार्गात बदल करण्यात आला. २७ आॅगस्टपासून ८ सप्टेंबरपर्यंत हा मार्ग बंद राहील. शहर परसिरात फिरणाऱ्या बस कुंभार वेसपर्यंत येतील. तिथून तुळजापूर वेस, शिवगंगा मंदिर, बाळीवेस, सम्राट चौकमार्गे बसस्थानक हा पर्यायी मार्ग असल्याचे परविहन उपक्रमाचे व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी कळवले.
खड्ड्यांतून स्वागत करायचे?
गणेशोत्सव तोंडावर असतानाही, महापालिकेने रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम अद्याप हाती घेतलेले नाही. त्यामुळे गणरायांचे स्वागत खड्ड्यांतून करायचे का, असा प्रश्न पद्मशाली युवक संघटनेने केला आहे. याबाबतचे विवेदन पालिकेचे उपायुक्त डाॅ. पंकज जावळे यांना देण्यात आले. या वेळी अध्यक्ष साईराम बिर्रू, मनीष बेत, सागर मामड्याल, सुनील कन्ना, प्रफुल्ल मादास आदी होते.

खड्डे बुजवा, बंद दिवे सुरू करा
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या, बंद पथदिवे सुरू करण्याच्या सूचना नगरअिभयंता गंगाधर दुलंगे यांनी झोन अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची बैठक झाली.
मिरवणूक मार्गावरील खड्डे प्रिमिक्सने बुजवावे आणि पाऊस असेल तर मुरूमने तात्पुरते बुजवावे. या मार्गावरील बंद असलेले दिवे आठ दवसिांत त्वरित सुरू करण्याचे आदेश वदि्युत विभागाचे आर. एम. परदेशी यांना दिले. मंडळाकडून मंडप मारण्यात येतो. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असून, तसे आवाहन मंडळाने करावे, अशी सूचना झोन अधिकाऱ्यांना देण्यात आली. परवानगी घेतली नसेल तर त्यांना परवानगी घेण्याची वविंती करावी, असे झोन
अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी टिळक चौक, कोंतम चौक, कन्ना चौक, बाळीवेस, आसरा, स्टेशन आदी ठिकाणी स्टॉल उभारण्यात येत असून, त्यासाठी पोलसिांचे ना- हरकत प्रमाणपत्र आल्यावर महापालिका प्रशासन परवानगी देते.
नगरच्या मूर्ती सर्वात महाग
नगरहून आलेल्या गणेशमूर्ती सर्वांग सुंदर आहेत. घरी वर्षभर पूजा करणारी मंडळी या मूर्तीची विवड करत असून, त्याची नोंदणी आताच करून ठेवत आहेत. अर्धा ते एक फूट उंच मूर्ती ८०० रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंत त्याच्या किमती आहेत.”
प्रशांत तुम्मा, मूर्तींचे व्यापारी
दरात १० टक्क्यांनी वाढ
प्लास्टर ऑफ पॅरसि, रंग-रसायने आदींच्या दरात यंदा १० टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे मूर्तींचे दरही तेवढ्याच प्रमाणात वाढवले. पाणी मुबलक नसल्याने यंदा मूर्ती कमी प्रमाणात तयार झाले. भक्तांनी अगोदरच नोंदणी करून मूर्तीची निवड करावी.”
अमर कनकी, अध्यक्ष, मूर्तिकार असोसिएशन