आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम: सोलापुरात फलकांना दिला फाटा; उत्तराखंडसाठी मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर- गणेशोत्सवातील डिजिटल फलकांना यंदा फाटा देऊन तोच बचत होणारा निधी उत्तराखंड मदतनिधीला द्यावा, असे आवाहन विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने बुधवारी पत्रकार परिषदेत केले. मध्यवर्ती मंडळ यंदा मरणोत्तर देहदान, नेत्रदानाचे फॉर्म भरून घेणे यांसह काही विधायक कार्यक्रम घेणार आहे.

उत्तराखंडमधील प्रलयामुळे तेथे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. डिजिटल फलकांवरील खर्च टाळून तो निधी विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाकडून पंतप्रधान निधीस पाठविण्यात येणारआहे. मंडळ नागरिकांकडून मरणोत्तर देहादान, नेत्रदानाचे फॉर्म भरून घेणार आहे. इच्छुकांनी 10 सप्टेंबर रोजी मध्यवर्ती मंडळाकडे नावे नोंदवावीत. दि.11 सप्टेंबर रोजी महिलांसाठी उखाणे स्पर्धा. दि.12 रोजी सकाळी 10 वाजताशिवदारे महाविद्यालयात प्रा. किशोर शिंगाडे यांचे ‘संसदमध्ये लोकशाही जिवंत आहे का’ या विषयावर व्याख्यान होईल. संदीप देसाई, अरुण शर्मा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आहेत.

शिक्षणासाठी दत्तक घेतले
मंडळाने 7 अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. निराधार मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च. प्राजक्ता कुलकर्णी हिस बीसीए शिक्षणासाठी दत्तक घेतले जाईल, अशी माहिती अध्यक्ष मधुमती चाटे यांनी दिली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फुलांची रांगोळी स्पर्धा
दि.13 रोजी राजस्व नगर रोड येथे वृक्षारोपण. दि.14 रोजी महिलांसाठी फुलांची रांगोळी स्पर्धा होणार आहे. इंचगिरी मठासमोरील मैदानाठिकाणी बसस्थानक करावे, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे करणार आहोत. दि.18 रोजी दुपारी 4 वाजता कमला नगर येथे मानाच्या गणतपीची पूजा पालकमंत्री दिलीपराव सोपल, क्रीडा अधिकारी भाग्यर्शी बिले, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.