आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival Solapur Dabholkar Murder Case Live Decoration

दाभोलकर खून, अत्याचार विषयांवर सोलापुरात सजीव देखावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजीव देखाव्यांसाठी यंदा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून, दिल्लीतील ‘निर्भया’ आणि मुंबईच्या शक्ती मिलमधील दुष्कर्म प्रकरण या विषयांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. यात चैतन्य मित्रमंडळ जोडभावी पेठ, जयशंकर मित्रमंडळ लोधी गल्ली, माृभूमी मित्रमंडळ घोंगडे वस्ती आदींचा समावेश आहे. शहरातील नाट्य कलावंत, नकलाकार या कामात गुंतले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना मांडणारे डॉ. दाभोलकर यांची हत्या म्हणजे विचारांवरील हल्ला असल्याचा आशय त्यांच्यावरील देखाव्यातील संहितेत आहे.

दाभोलकर हाच विषय
गणेशोत्सव मंडळांनी यंदा डॉ. दाभोलकरांच्या विषयालाच मोठी पसंती दिली. त्यातील घटनाक्रम स्टेजवर सादर करणे सोपे आहे. तशा पद्धतीने आवाज देण्याचे काम आम्ही कलावंत करत आहोत. एकूणच हा विषय गणेशभक्तांना आवडणारा आहे.
-अबुल हसन, मधुरध्वनी रेकॉर्डिंग रूम

महिलांवरील वाढत्या अत्याचारांकडे लक्ष वेधणारे विषय यंदा आले. मोहोळ, बार्शी, करमाळा, माढा या तालुक्यांतील गणेशोत्सव मंडळांनी याच विषयांवर सजीव देखावे करण्याचा निर्णय घेतला. या ज्वलंत विषयाच्या सादरीकरणासाठी कलावंत जीव ओतत आहेत.
-हकीम शेख, मिलन रेकॉर्डिंग रूम