आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसहभागातून मोक्याच्या जागी सीसीटीव्ही, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गणेशोत्सवमिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी यंदा आठही मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गांवरील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांची मदत घेण्यात आली आहे. सोमवारी अनंत चतुर्दशी असून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचे पडलेले हे पाऊल नक्कीच दिलासा देणारे आहे.


मौलाली चौकात आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून सीसीटीव्ही सुरू झाले आहेत. ही यंत्रणा हायटेक असून ऑनलाइन यंत्रणा तयार करण्यात आली आहे. याचे चित्रीकरण बसल्याठिकाणी पोलिस अधिकारी मोबाइलवरून पाहू शकतात. अन्य चौकातही नागरिकांच्या सहकार्यातून कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती सदर बझारचे पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिली.
लोकमान्य आणि मध्यवर्ती गणपती मंडळाच्या मिरवणूक मार्गावरील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात दत्त चौक, चौपाड, बाळीवेस, पंजाब तालीम, सोन्या मारुती, शिवाजी चौक, मधला मारुती, माणिक चौक, लक्ष्मी मार्केट भाजी मंडई आदी भागांचा समावेश आहे. शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलिसांनी याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार त्यांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती फौजदार चावडीचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.

साध्या वेशातील पोलिसांची गस्त
शनिवाररविवारी देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. महिला, तरुणी यांची छेडछाड होऊ नये, मंगळसूत्र, पाकीटमार, मोबाइल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस, महिला गस्ती पथक नेमण्यात आले आहेत. महिलांनीही सुरक्षितता म्हणून दागिने, लहान मुले, मोबाइल, पाकीट सांभाळावेत. शर्मिष्ठाघारगे, साहाय्यकपोलिस आयुक्त
कायम व्यवस्थेसाठी संवाद
सीसीटीव्हीकायमस्वरूपी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलिस ठाण्यानुसार आम्ही संवाद साधत आहोत. नागरिकांचीही साथ मिळतेय हे महत्त्वाचे आहे. आठही मध्यवर्ती मंडळांच्या मार्गावर कॅमेऱ्याची सोय झाल्यामुळे पोलिसांना चांगले नियोजन करता येईल. सुभाषबुरसे , पोलिसउपायुक्त

नागरिक, व्यापारी सरसावले
महत्त्वाच्यामिरवणूक मार्गांवर सीसीसीव्ही कार्यान्वित करण्यासाठी नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला होता. त्यानुसार दुकानदार, नागरिक यांच्या पुढाकारातून कॅमेराच्यांची सोय झाली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल. प्रदीपरासकर, पोलिसआयुक्त