आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चाच बाप्पा; मूर्तीकारांचा शाडूच्या मातीलाही स्पर्श नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश केले होते. त्यात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. प्रदूषण रोखण्यासाठी 2010 मध्ये या सूचना केल्या. त्यानुसार नाशिक, नागपूर, सातारा येथील महापालिकांनी काही नियम केले. सुजाण नागरिक आणि संस्थांच्या पुढाकारातून तिथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापुरात मात्र याचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही.

गणेशमूर्ती निर्मितीबाबत सोलापूर महत्त्वाचे केंद्र बनले आहे. कर्नाटक, तेलंगण या राज्यांसह मराठवाड्यात येथील मूर्ती जात असतात. सुमारे 5 लाख लहान-मोठय़ा आकारांतील मूर्तीं या शहरात तयार करण्यात येतात. साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यात या कामास सुरुवात होते. ऑगस्टमध्ये रंगकामाची लगबग असते. यंदाची ही लगबग पाहताना एका ठिकाणीही शाडूच्या मातीची मूर्ती दिसलेली नाही. उच्च न्यायालयाच्या सूचनांची माहिती कित्येक मूर्तिकारांना नाही.

मातीने बनवण्यात अडचणी
प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची सूचना योग्य आहे; परंतु ते कृतीत उतरवणे अशक्य आहे. कारण तेवढी माती उपलब्ध होत नाही, नैसर्गिक रंग मिळत नाहीत. महत्प्रयासाने मिळवले तरी त्याचा मोबदला तेवढा मिळेल याचा भरवसा नाही. भक्तांना मूर्ती आकर्षक, विविध रंगांनी सुंदर हवी असते. मातीपासून या अपेक्षा पूर्ण करणे केवळ अशक्य आहे.
-अमर कनकी, अध्यक्ष, मूर्तिकार असोसिएशन

सोलापुरात काय होते?
सिद्धेश्वर, कंबर तलाव, हिप्परगा येथील जलायशांत गणेशमूर्तींचे विसर्जन होते. पैकी सिद्धेश्वर तलावातच पर्यायी विसर्जनाची व्यवस्था केली जाते. पर्यायी व्यवस्थेत मूर्ती तीनवेळा हलवून ती महापालिकेच्या वाहनात ठेवून देणे अशी व्यवस्था हवी. तसे होत नाही.

इतर शहरात बंदी
सातारा महापालिकेने रासायनिक रंग वापरण्यावर बंदी घातली. मूर्तिकारांना नोटिसा बजावल्या
नागपूर महापालिकेने मूर्ती विसर्जनाचे अधिनियम करून जलाशयातील विसर्जनावर बंदी घातली
नाशिक, कोल्हापूर महापालिकांनी नदीतील विसर्जनाला बंदी घालून कृत्रिम जलाशय तयार केले
सोलापूर महापालिकेने सिद्धरामेश्वर तलावात मूर्ती विसर्जनासाठी छोटीशी जागा करून दिली.

'औरंगाबाद पॅटर्न’ने प्रश्न सुटेल
प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर कायद्याने बंदी नाही. त्यामुळे मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्तीच बनवल्या पाहिजेत, अशी अपेक्षा नाही. औरंगाबादच्या सरस्वती भुवनने कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले. त्यातून गेल्या वर्षी पाच हजार मूर्ती तयार झाल्या. याच मूर्तीची घरात प्रतिष्ठापना झाली. यंदा एक लाख मूर्ती बनवण्याचा संकल्प पूर्णत्वास येत आहे. औरंगाबादचा हाच पॅटर्न पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची नांदी आहे.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर, कार्याध्यक्ष, अंनिस


>मुंबई उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गणेशमूर्ती आणि दुर्गा विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याची सूचना केली.
>केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याचे नियम तयार केले. 3 मे 2011 रोजी राज्याच्या पर्यावरण खात्याकडे देऊन आदेश काढले.
>मध्ये गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून गणेश किंवा दुर्गामूर्ती बनवण्यावर बंदी घातली.
>गुजरातच्या निर्णयावर मूर्तिकारांनी ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’कडे दाद मागितली. ट्रिब्युनलने मूर्तीनिर्मितीवरील बंदी फेटाळून, विक्रीवर निर्बंध घालण्याची सूचना.