आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Kulkarni Murder Case: 37 Injuries Died Him

गणेश कुलकर्णी खून खटला: शरीरावरील ३७ जखमांमुळे मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोटार वाहनाच्या धडकेमुळे गणेश कुलकर्णी यांच्या शरीरावर १७ ठिकाणी जखमा आढळून आल्या. शरीरांतर्गत २० जखमा होत्या. अशा ३७ जखमांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची महत्त्वपूर्ण साक्ष शवविच्छेदन करणारे डॉ. अनिल हुलसूरकर यांनी गुरुवारी नोंदवली.
माढ्यात झालेल्या गणेश कुलकर्णी खून खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांच्यासमोर झाली. या खटल्यातील २३ व्या साक्षीदाराच्या रूपात डॉ. हुलसूरकर न्यायालयात हजर झाले. त्यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) केले होते. खटल्यातील विशेष सरकारी वकील अरविंद अंदोरे यांनी त्यांची साक्ष घेतली.

त्या वेळी डॉ. हुलसूरकर म्हणाले, “कुलकर्णी यांच्या शरीरावर १७ प्रकारच्या जखमा दिसून आल्या. २० जखमा या शरीराच्या आत होत्या. डोके, मेंदू, छातीचा भाग, हृदय, पोट अशा भागांवर सुमारे ३७ जखमा झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. जीप अथवा कारसारख्या चारचाकी गाडीने धडक दिल्यानंतरच अशा प्रकारच्या जखमा होऊ शकतात.”

उलट तपासणीत आरोपीचे वकील धैर्यशील पाटील (सातारा) यांनी डॉ. हुलसूरकर यांचे मत चुकीचे असल्याचे सांगितले. मूळ फिर्यादीतर्फे अॅड. अब्बास काझी, अॅड. अहमद काझी, अॅड. समीर माशाळे हे काम पाहात आहेत. आरोपींतर्फे अॅड. पाटील यांच्यासह अॅड. भारत कट्टे, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. व्ही. के. पाटील काम पाहात आहेत.