आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Kulkarni Murder Case News In Marathi At Solapur

निवडणुकीच्या कारणाने पतीचा खून केला, फिर्यादी ज्योती कुलकर्णी यांची साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उपळाई ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवामुळे चिडून सर्व आरोपींनी माझ्या पतीचा खून केला, अशी साक्ष फिर्यादी ज्योती गणेश कुलकर्णी यांनी गुरुवारी सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांच्यासमोर दिली.

२०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरोपी संदीप पाटील यांच्या पार्टीचा गणेश कुलकर्णी पार्टीने पराभव केला. यामुळे चिडून १४ ऑक्टोबर २०११ रोजी गणेश कुलकर्णी हे मॉर्निंग वॉकला गेले असताना आरोपींनी त्यांचा खून केला. खुनापूर्वी आरोपींनी गणेश कुलकर्णी यांना खुनाच्या धमक्या दिल्या होत्या, अशी साक्ष फिर्यादी ज्योती कुलकर्णी यांनी दिली. फिर्यादीने न्यायालयात चार आरेापींना ओळखले. अारोपीपैकी संदीप पाटील हा आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजित शिंदे यांच्या जवळचा नातेवाइक असल्याचे फिर्यादीने सांगितले. त्यांचा उलट तपास सुरू असून खटल्याची पुढील सुनावणी १९ २० मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अरविंद अंदोरे, मूळ फिर्यादीकडून अॅड. अब्बास काझी, अॅड. अहमद काझी, अॅड. समीर माशाळे, आरोपींकडून अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. बी. डी. कट्टे, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. व्ही. के. पाटील यांनी काम पाहिले.