आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह, उत्कंठा अन् लगबग; सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका, जल्लोषाचे वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - संकटे, विघ्ने नष्ट करणारी देवता, बुद्धी आणि ज्ञानाचा उद्गाता बाप्पा गजाननाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्कंठा, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे. रविवारी दुपारी झालेल्या पावसाच्या हलक्या सरींनी त्यात आणखी भर पडली. सोमवारी (ता. 9) सकाळपासूनच बाप्पांची घरोघरी प्रतिष्ठापना होईल. सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुका निघतील. त्यानंतर दहा दिवस हा उत्सव चालणार आहे.

टिळक चौक, मधला मारुती, कन्ना चौक ते राजेंद्र चौक, विजापूर रस्ता, होटगी रस्ता आदी ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. घरातील गणेशाला निवडण्यासाठी भक्तांच्या नजरा भिरभिरू लागल्या. पसंतीची मूर्ती उचलून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सुरू झाला. गुलाल, चुरमुरे उधळून भक्तमंडळी आनंदात न्हाऊन गेली. गणेशाच्या स्वागतासाठी घरोघरी सजावट झाली. आकर्षक मखर, विजेच्या माळा सोडण्यात आल्या. भक्तिगीते सुरू झाली. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही लगबग सुरू झाली. मिरवणुकांसाठी वाहने सजू लागली. लेझीम पथक, झांज, ढोल पथकांची जय्यत तयारी झाली. बाल मंडळांचे छोटे कार्यकर्तेही छोट्या बाप्पांसाठी बाजारात फिरत आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या मूर्ती आल्या आहेत. र्शीकृष्ण, महादेव, शिवराय, लालबागचा राजा अशा रूपांतील छोटे बाप्पा लहानग्यांना खुणावत आहेत.

ताता गणपतीने यंदाही प्रतिष्ठापना मिरवणूक काढणार नाही. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विधायक उपक्रम राबवण्यासाठी आठ वर्षांपूर्वी असा निर्णय घेतला. तो यंदाही कायम ठेवल्याचे मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले. मार्कंडेय चौकात सकाळी अकराला उद्योगपती विजयकुमार द्यावरकोंडा यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना होईल.

1351 मंडळांकडून होणार प्रतिष्ठापना
शहरात एकूण 1351 सार्वजनिक मंडळांची पोलिसांकडे नोंद झाली. गेल्या वर्षी या मंडळांची संख्या 1345 होती. त्यात यंदा सहा मंडळांची भर पडली. प्रत्येक मंडळाला परवाना देण्यात आला. उत्सव काळातील नियमावली देण्यात आली. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहेत नियम