आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गणपती बाप्‍पा मोरया, पुढच्‍या वर्षी लवकर या !\' सोलापुरात जल्‍लोषात विसर्जन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गणपती बाप्‍पा मोरया, पुढच्‍या वर्षी लवकर या ! या गजरात सोलापुरकरांनी आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पाला निरोप दिला. उत्‍साही गणेश भक्‍तांना वरूण राजाही रोखू शकला नाही. आकाशातून पडणा-या पावसाचा जसा वेग वाढत होता, त्‍याप्रमाणेच गणेश भक्‍तांचा उत्‍साहही दुणावत होता.

शहरात विविध ठिकाणी श्रीगणेशाचे विसर्जन करण्‍यात येत असून मुख्‍यत्‍वे श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील गणपती घाट आणि विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव (कंबर तलाव) येथे मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. विविध मंडळांचे कार्यकर्ते गुलालाची मुक्‍तपणे उधळण करीत आपल्‍या लाडक्‍या गणरायाला निरोप देत आहेत. सार्वजनिक गणेशोत्‍सवाबरोबरच घरगुती गणेशांचेही विसर्जन होताना दिसतेय. आबालवृद्धांपर्यंत सर्वचजण तल्‍लीन होऊन लंबोदराला पुढच्‍या वर्षी लवकर येण्‍याचा प्रेमळ आग्रह करीत आहेत. मानाच्‍या गणपतींचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत होईल.


लेझिम, झांज, टिपरी तसेच डॉल्‍बीच्‍या निनादात वेगवेगळे मंडळे विसर्जन मिरवणूकीत सामील झाले आहेत. ही मिरवणूक पाहण्‍यासाठी लोक सहकुंटूंब सामील झाल्‍याचे दिसून येत आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सोलापुरातील श्री गणेश विसर्जनाचे फोटो...