आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराप्रश्नी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला घेतले फैलावर, कोट्यवधी रुपये खर्चूनही शहर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - समीक्षाकंपनीचा मक्ता रद्द केल्यानंतर तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एक महिन्याच्या कालावधीसाठी शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता पाच मक्तेदारांना दिला होता. मात्र, कोणतीही सूचना देता मनपा प्रशासनाने मागील पाच महिन्यापासून मक्ता चालू ठेवला. याशिवाय इतर मक्तेदाराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी देणे असताना या मक्त्याचे कोटी २० लाख अदा केले. या प्रकरणात सामूहिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कचरा प्रश्नावर पदाधिकारी प्रशासनावर आरोप करत आहे. मनपाही कचऱ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे.

स्थायी समितीची सभा गुुरुवारी सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पूर्वी शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता समीक्षा कंपनीकडे होता. वर्षापोटी मनपा समीक्षाला १६ कोटी देत होते. समीक्षाने सुमारे दोन वर्षांपर्यंत काम केले. त्यानंतर त्यांचा मक्ता रद्द करण्यात आला. याच काळात गड्डा यात्रा अाल्याने एक महिन्यासाठी कचरा उचलण्यासाठी मक्ता गुडेवार यांनी पाच मक्तेदारांना दिला. एक महिन्यासाठी ३५ लाख रुपये मक्ता ठरला. महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्याच मक्तेदाराला मक्ता देण्यात आला. मक्त्याला मुदतवाढ देताना स्थायीला विचारलेही नाही, परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

महापालिका प्रशासनाने पहिल्यांदाच महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्याचा अहवाल स्थायी समितीत सादर केला. पाचशे कोटी रुपयांची तूट दर्शवण्यात आली. मात्र, ही तूट कशी भरून काढता येईल याबाबत काहीच उपाययोजना दाखवण्यात आल्या नाहीत. १५० कोटी रुपये कर आकारणीची थकबाकी दाखवण्यात आली आहे. वसुलीचे जेवढे उद्दिष्ट दाखवण्यात आले होते त्याची वसुली नाही.

पाचशे कोटी तुटीचा अहवाल, महिन्यात अहवाल सादर करा
मध्यंतरीमहापालिकेने स्वत:च्या मालकीची घंटागाडी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील घंटागाड्या फेब्रुवारी तर दुसऱ्या टप्यातील घंटागाड्या एप्रिल महिन्यात आणण्यात आल्या. दोन टप्प्यात ७० नवीन घंटागाड्या आणण्यात आल्या. मनपाच्या गाड्या आल्यानंतर मक्ता बंद करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने मनमानी कारभार करत मक्ता सुरू ठेवला आणि कोटी २० लाख रुपये इतकी मोठी रक्कम अदाही केली. मक्तेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवक बाबा मिस्त्री, सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे आदींनी केला. या प्रश्नावर प्रशासनाला उत्तर देता आले नाही. दरम्यान या प्रकरणाचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश सभापती पद्माकर काळे यांनी दिले आहेत.

वसुली नाहीच, केवळ सूचनाच
२०१२ते २०१४ पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले नाही. यातून ५१८ कोटी रुपये थकीत दाखवण्यात आले आहेत. याची वसुली झाली असती तर महापालिका तोट्यात आली नसती, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबलच्या खोदकामातून, अनधिकृत बांधकाम, बेकायदा मिळकतींचे शोध, बोगस नळजोडणी शोधमोहीम आदी कामांतून उत्पन्न वाढेल, अशा सूचना केल्या.